सिंह राशीत शुक्र करणार प्रवेश; `या` 4 राशींच्या व्यक्तींच्या आयुष्यात होऊ शकते उलथापालथ!
जाणून घ्या कोणत्या राशींच्या लोकांच्या अडचणी वाढणार आहेत.
मुंबई : शुक्र 31 ऑगस्ट रोजी सिंह राशीत प्रवेश करणार आहे. असं म्हणतात की, ज्या व्यक्तीच्या कुंडलीत या ग्रहाची स्थिती मजबूत असते त्याला जीवनातील सर्व सुख-सुविधा प्राप्त होतात. शुक्रावर वृषभ आणि तूळ राशीचं राज्य असतं. हा ग्रह मीन राशीत उच्च आणि कन्या राशीत दुर्बल आहे. भरणी, पूर्वा फाल्गुनी आणि पूर्वाषाध नक्षत्र शुक्राच्या अंतर्गत येतात. जाणून घ्या कोणत्या राशींच्या लोकांच्या अडचणी वाढणार आहेत.
मेष
छोट्या-छोट्या गोष्टींवरून प्रिय व्यक्तीशी वाद होऊ शकतो. तुम्ही अविवाहित असाल आणि जोडीदाराच्या शोधात असाल तर तुम्हाला अजून थोडा वेळ थांबावं लागेल. आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल.
वृश्चिक
या काळात तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं. पैशाबाबत काळजी घ्यावी लागेल. गाडी, घर किंवा कोणत्याही निरुपयोगी वस्तूंवर तुम्हाला खूप पैसा खर्च करावा लागू शकतो. या काळात कोणत्याही व्यक्तीला कर्ज देणं टाळा.
मकर
या काळात आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. तुमचं आरोग्य बिघडू शकतं. तुम्हाला हॉस्पिटलमध्ये जावं लागू शकते.
मीन
या मार्गक्रमणात तुम्हाला अनेक समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. जर तुम्ही विवाहित असाल तर तुमचं तुमच्या जोडीदाराशी भांडण होऊ शकतं. कदाचित तुम्ही मोठ्या संकटात सापडू शकता.
(Disclaimer : येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)