Shukra-Shani Gochar: शुक्र-शनीने बदलली चाल; दोन ग्रह `या` राशींना मिळवून देणार भरपूर पैसा
Shukra Gochar and Shani Margi 2023 November: शुक्र हा सुख, विलास, ऐश्वर्य आणि संपत्तीचा कारक आहे. तर न्यायाची देवता शनी हा परिश्रम, न्याय आणि सेवेचा स्वामी आहे. शनी आणि शुक्राच्या हालचालीतील बदल 4 राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरणार आहे.
Shukra Gochar and Shani Margi 2023 November: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह त्याच्या ठराविक वेळेनंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यामध्ये शुक्र आणि शनि ग्रहांना खूप महत्त्व दिलं जातं. नुकतंच शुक्राचं गोचर झालं असून शनी मार्गस्थ झाला आहे. नोव्हेंबर महिन्यात दिवाळीपूर्वी शनी आणि शुक्राच्या स्थितीत मोठा बदल लोकांचे नशीब बदलू शकतो.
शुक्र हा सुख, विलास, ऐश्वर्य आणि संपत्तीचा कारक आहे. तर न्यायाची देवता शनी हा परिश्रम, न्याय आणि सेवेचा स्वामी आहे. शनी आणि शुक्राच्या हालचालीतील बदल 4 राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरणार आहे. दिवाळीच्या आधी जाणून घेऊया कोणाचे नशीब चमकणार आहे.
शनी आणि शुक्राच्या गोचरमुळे या राशींना मिळणार लाभ
मेष रास
मेष राशीच्या लोकांसाठी नोव्हेंबर महिना खूप शुभ राहणार आहे. या काळात तुम्हाला अनपेक्षित आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. नोकरदार लोकांच्या उत्पन्नात वाढ होऊ शकते. नोकरीच्या नवीन संधी मिळतील. नफा वाढणार आहे.
वृषभ रास
वृषभ राशीच्या लोकांसाठी शुक्र आणि शनीच्या स्थितीतील बदल जीवनात अनेक सकारात्मक बदल घडवून आणणार आहेत. तुमच्या मेहनतीला फळ मिळू शकणार आहेत. तुम्हाला भरपूर संपत्ती मिळेल. कोर्टाशी संबंधित निर्णय तुमच्या बाजूने येऊ शकतात. अविवाहित लोकांचं नातं कायमचं होऊ शकतं.
मिथुन रास
मिथुन राशीच्या लोकांना दिवाळीपूर्वीच आनंद साजरा करण्याची संधी मिळू शकणार आहे. गुंतवणुकीतून आर्थिक लाभ होऊ शकतो. शुक्र आणि शनीच्या आशीर्वादाने राहणीमानात सुधारणा होणार आहे. तुमच्या जीवनात सकारात्मक बदल होतील. तुमची आर्थिक स्थिती सुधारणार आहे. प्रलंबित काम पूर्ण झाल्यामुळे मनात आनंद राहील.
मकर रास
मकर राशीच्या लोकांसाठी शुक्र आणि शनी आनंदाचे क्षण आणणार आहे. दिवाळीपूर्वीही बंपर नफा मिळू शकतो. करिअरशी संबंधित संधी तुम्हाला लाभदायक ठरतील. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. विवाहितांचे वैवाहिक जीवन यावेळी मधुर असणार आहे.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)