Malavya Rajyog: मे महिन्यात शुक्र ग्रह बनवणार मालव्य राजयोग; `या` राशींना होऊ शकतो धनलाभ
Venus Transit In Taurus: ज्योतिष्य शास्त्रानुसार, शुक्र सुमारे 1 वर्षानंतर वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. याच बरोबर शुक्राच्या गोचरमुळे मालव्य राजयोग तयार होणार आहे. यामुळे काही राशींचं भाग्य उजळू शकणार असून आयुष्यात आनंद येणार आहे.
Venus Transit In Taurus: वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी ग्रहांच्या गोचरमुळे खास शुभ आणि अशुभ राजयोग तयार होतात. यावेळी संपत्ती आणि समृद्धी देणारा शुक्र 19 मे रोजी स्वतःच्या राशीत वृषभ राशीत प्रवेश करणार आहे.
ज्योतिष्य शास्त्रानुसार, शुक्र सुमारे 1 वर्षानंतर वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. याच बरोबर शुक्राच्या गोचरमुळे मालव्य राजयोग तयार होणार आहे. यामुळे काही राशींचं भाग्य उजळू शकणार असून आयुष्यात आनंद येणार आहे. जाणून घेऊया कोणत्या राशींच्या व्यक्तींना मालव्य राजयोगामुळे लाभ मिळणार आहे.
वृषभ रास (Taurus Zodiac)
वृषभ राशीच्या लोकांसाठी मालव्य राजयोगाची निर्मिती फायदेशीर ठरू शकते. हा योग तुमच्या जीवनात सकारात्मक प्रभाव वाढवणारा मानला जातो. तुमचे व्यक्तिमत्व सुधारेल. विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन छान असणार आहे. तुम्ही तुमच्या आत्मविश्वासाने आणि धैर्याने मोठे काम सहजपणे करू शकाल. तुम्हाला करिअरशी संबंधित काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागणार आहेत. लोकांच्या व्यक्तिमत्त्वात आणि कार्यशैलीत बदल दिसू शकतात.
सिंह रास (Leo Zodiac)
मालव्य राजयोगाची निर्मिती तुमच्यासाठी अनुकूल ठरू शकते. तुम्हाला तुमच्या नोकरीत नवीन संधी मिळतील. नोकरी करणाऱ्यांना वेतनवाढ आणि पदोन्नती मिळू शकते. कामानिमित्त प्रवास करण्याची संधी मिळेल. तुमच्या लव्ह लाईफमध्ये या काळात तुमच्या जोडीदारासोबतचे तुमचे नाते खूप मैत्रीपूर्ण असणार आहे.वडिलांसोबत तुमचे नाते अधिक घट्ट होईल. तुम्हाला कामाच्या ठिकाणी फायदे मिळतील.
कन्या रास (Kanya Zodiac)
कन्या राशीच्या लोकांसाठी मालव्य राजयोग फायदेशीर ठरू शकतो. आर्थिक बाबतीतही तुमची स्थिती खूप मजबूत असेल. यावेळी तुम्ही देश-विदेशातही प्रवास करू शकता. तुम्हाला तुमच्या व्यवसायात नवीन ऑर्डर मिळू शकतात. कामाच्या ठिकाणाबाबत बोलायचं झालं तर तुमचं काम पाहून वरिष्ठ अधिकारी खुश होणार आहेत. स्पर्धात्मक विद्यार्थ्यांना कोणत्याही परीक्षेत यश मिळू शकते. या काळात तुम्ही तुमची जागा बदलण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला इच्छित स्थान मिळू शकते.
( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )