Shukra Gochar 2023 in Kanya Rashi: ज्योतिषशास्त्रात शुक्र हा सुखाचा कारक मानला जातो. सध्या शुक्र सिंह राशीत असून लवकरच त्याचे राशी बदलून कन्या राशीत प्रवेश करणार आहे. दरम्यान ग्रहाच्या गोचरचा परिणाम हा सर्व राशींच्या व्यक्तींवर होताना दिसतो. यावेळी 4 राशीच्या लोकांना शुक्र ग्रहाच्या राशी बदलाचा जास्तीत जास्त फायदा होणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ज्योतिषीय शास्त्रानुसार, शुक्र 3 नोव्हेंबरला पहाटे 05:13 वाजता सिंह राशीतून बाहेर पडणार आहे आणि कन्या राशीत प्रवेश करेल. या दरम्यान 12 नोव्हेंबरला हस्त नक्षत्रात आणि 24 नोव्हेंबरला चित्रा नक्षत्रात प्रवेश करणार आहे. यानंतर शुक्र ग्रह 30 नोव्हेंबर रोजी तूळ राशीत प्रवेश करणार आहे.


वृषभ रास


वृषभ राशीचा स्वामी शुक्र आहे. यावेळी घरामध्ये शुक्राचे संक्रमण कुटुंबात आनंद आणणार आहे. मुलांकडून आनंद मिळेल. तसंच तुमचा सन्मान आणि दर्जा वाढेल. तसंच वृषभ राशीच्या लोकांचे प्रेमविवाहही होणार आहे. पगारदार लोकांना पदोन्नती आणि वेतनवाढ मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही काही धार्मिक किंवा व्यवसायाशी संबंधित कारणासाठी प्रवास करू शकता. 


तूळ रास


तूळ राशीचा स्वामी शुक्र आहे. कन्या राशीच्या गोचरदरम्यान शुक्र तूळ राशीच्या बाराव्या घरात असणार आहे. तूळ राशीचे लोक सुखासाठी पैसा खर्च करू शकतात. या काळात तुम्ही घर किंवा वाहन खरेदी करू शकता. यावेळी केलेली गुंतवणूक तुमच्या संपत्तीत वाढ करणार आहे.  उत्पन्नाच्या नवीन शक्यताही निर्माण होऊ शकतात. तुम्हाला वेळोवेळी पैसे मिळत राहणार आहेत. 


वृश्चिक रास


राशीच्या बदलादरम्यान शुक्र वृश्चिक राशीच्या उत्पन्नाच्या घराकडे पाहणार आहे. यामुळे वृश्चिक राशीच्या लोकांच्या उत्पन्नात आणि सौभाग्यामध्ये प्रचंड वाढ होणार आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होणार आहे. करिअर आणि व्यवसायातही तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. या लोकांना नोव्हेंबर महिन्यात जास्तीत जास्त फायदा होणार आहे. नोकरदार लोकांचा प्रभाव कामाच्या ठिकाणी वाढू शकतो.


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)