Vidur Niti: `ही` विदुर नीति वापरा, स्वत:च्याच भरभराटीवर बसणार नाही विश्वास
विदुर; महाभारत (Mahabharat katha) या महाकाव्यातील एक असं नाव जे प्रचंड आदरानं घेतलं जातं. महाभारतामध्ये विदुर यांची भूमिका किती महत्त्वाची होती हे आपण सर्वच जाणतो.
Vidur Niti details: विदुर; महाभारत (Mahabharat katha) या महाकाव्यातील एक असं नाव जे प्रचंड आदरानं घेतलं जातं. महाभारतामध्ये विदुर यांची भूमिका किती महत्त्वाची होती हे आपण सर्वच जाणतो. हस्तिनापूरचे महाराज, धृतराष्ट्र यांचे प्रमुख सल्लागार आणि महामंत्री म्हणून विदुर कायमच चर्चेचा विषय ठरले आहेत. विश्वास बसणार नाही, पण विदुरांना धर्मराजाचा अवतार म्हणूनही ओळखलं जातं. (Mahabharata) महाभारतातील युद्ध घडत असताना त्याच्या परिणामांविषयी वक्तव्य करत विदुरांनी सर्वांनाच होणाऱ्या विनाशाबद्दल सतर्क केलं होतं. अखेर ज्याची भीती होती तेच झालं आणि सर्वांना विदुर यांचे शब्द आठवले. (Vidur Niti in Mahabharat to achieve respect and happiness)
विदुर यांची वाणी अनेकांसाठी प्रमाण होती. त्यांच्या बोलण्यातून अनेक अशा गोष्टी अधोरेखित केल्या जात होत्या, ज्या आजच्या काळातील आयुष्यालाही लागू होतात. (Truth) सत्य हाच ईश्वरप्राप्तीचा अंतिम मार्ग आहे, असं म्हणत विदुर कायम सत्यासाठीच आग्रही होते.
सत्य म्हणजे अंतिम टप्पा....
सत्य हेच सर्वस्व आहे, असं (Vidur niti) विदुर यांचं ठाम मत. जी मंडळी सत्याला तुच्छ लेखतात त्यांचं चित्त कधीच थाऱ्यावर नसतं. त्यांच्या मनाला कधीच शांतता लाभत नाही, सर्वकाही असूनही ही मंडळी कसल्या न कसल्या शोधात असतात.
वाचा : How To Lighting Diya : देव्हाऱ्यात दिवा लावताना 'हे' अजिबात करु नका! फळणार नाही पूजा
थोडक्यात विदुर नीतिनुसार सत्याचाच स्वीकार करुन त्याच्या मार्गावर चाला, जीवनातील सर्व दु:ख दूर जातील. जीवन सार्थकी लागेल आणि अत्यानंदाचा अनुभव तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीनं घेता येईल.
इतकी भरभराट होईल की...
(Vidur niti priciples) सत्याच्या वाटेवर चालणाऱ्या मंडळींच्या आयुष्यात इतकी भरभराट होईल, की तेच यावर विश्वास ठेलण्यापूर्वी दोनदा विचार करतील. व्यक्तीनं कायम पापमुक्त जीवन जगावं असंच विदुर सांगतात. ज्या मंडळींना सत्याचा गभितार्थ उमगतो त्यांच्या आयुष्यात सुख आणि समृद्धिची उधळण होते. दु:ख त्यांच्यापासून कैक मैल दूर जातात. समाजात त्यांना मिळणारी आदरभावना वाढते. त्यामुळं कायम सत्याच्याच मार्गावर चाला असा संदेश विदुर नीति देते.