Thursday Remedies : आज दुहेरी योग! संपत्ती मिळविण्यासाठी आजच करा `हा` उपाय, होईल भरपूर धनप्राप्ती
Thursday Remedies : आज गुरुवार...तुम्हाला आर्थिक समस्येपासून सुटका हवा आहे. मग ज्योतिषशास्त्रानुसार आज काही उपाय केल्यास तुम्हाला अपार धनसंपत्ती आणि सुख प्राप्त होईल.
Thursday Remedies in marathi : गुरुवार हा भगवान विष्णूला समर्पित करण्यात आलेला दिवस आहे. आजच्या दिवशी तुम्ही श्रीहरीची पूजा आणि उपासना केली तर तुमच्या घरात कायम लक्ष्मी नांदेल. हा दिवस श्रीहरीचा आशीर्वाद मिळविण्याचा सर्वोत्तम दिवस मानला जातो. या दिवशी विधीनुसार भगवान विष्णूची पूजा केली जाते आणि उपवास केला जातो. त्यात आज दुहेरी योग आहे. कारण गुरुवारच्या दिवशी विजया एकादशी (Vijaya Ekadashi 2023) आल्यामुळे आजचा दिवस खूप शुभ आहे. आज कुठलेही कार्य केल्यास तुम्हाला यश मिळणार. शिवाय तुमच्या घरावर लक्ष्मीमातेची कृपा राहणार.
या दिवशी केलेले उपाय जीवनात अपार सुख आणि समृद्धी देतात. म्हणूनच धर्म आणि शास्त्रांमध्ये गुरुवारसाठी काही नियम आणि उपाय सांगण्यात आले आहेत. हे उपाय कुंडलीत गुरु ग्रह मजबूत करतात. गुरू बलवान असल्यास जीवनात सौभाग्य वाढते, वैवाहिक सुखही मिळते. ज्या लोकांच्या कुंडलीत बृहस्पति अशक्त किंवा दुर्बल आहे त्यांनी गुरुवारी हे उपाय अवश्य करावेत. (Vijaya Ekadashi 2023 Thursday Remedies or upay for money astro tips in marathi)
गुरुवारचे उपाय (Thursday Remedies)
कुंडलीत गुरु ग्रह कमजोर असेल तर अशा व्यक्तीने गुरुवारी केळीच्या झाडाची पूजा करावी. केळीच्या झाडात भगवान विष्णू वास करतात असं मानलं जातं. याशिवाय केळीच्या झाडाखाली दिवा लावावा. असं केल्याने भरपूर संपत्ती मिळते. लग्न लवकर होतं. लक्षात ठेवा गुरुवारी केळी खाऊ नका.
गुरूंचा आशीर्वाद मिळविण्यासाठी दर गुरुवारी पाण्यात चिमूटभर हळद टाकून स्नान करावं.
गुरुवारी पिवळे कपडे परिधान केल्याने कामात यश मिळतं.
गुरुवारी उपवास ठेवल्याने भगवान विष्णूचा अपार आशीर्वाद मिळतो. पूजेमध्ये पिवळ्या रंगाची मिठाई अर्पण करा आणि हा प्रसाद स्वतः घ्या.
गुरुवारी सोने, हळद, हरभरा, पिवळी फळे इत्यादी पिवळ्या वस्तूंचं दान करा. गुरुवारी गुळाचं दान केल्याने खूप फायदा होतो.
पैशाच्या प्रवाहात किंवा प्रगतीमध्ये अडथळा येत असेल तर केळीच्या झाडाच्या मुळाचा तुकडा पिवळ्या कपड्यात बांधून गुरुवारी गळ्यात घाला. असं केल्यानं सर्व अडथळे लवकर दूर होतील आणि वेगाने प्रगती होईल.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)