Vish Yog 2023 Effect : चंद्र आणि शनिच्या संयोगामुळे अतिशय विनाशकारी असा विष योग तयार होतो आहे. चंद्र हा सर्वात जलद गतीने एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. तर शनिदेव हा अडीच वर्षांने एका राशीतून दुसऱ्या राशीत गोचर करतो. लवकरच चंद्र आणि शनि (Shani Chandra Yuti 2023) या दोघांच्या एकत्र येण्यामुळे 30 ऑगस्टला 2023 विष योग निर्माण होतो आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

30 ऑगस्टला 2023 सकाळी 10.19 वाजता चंद्र कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. तर 1 सप्टेंबर 2023 ला सकाळी 9.36 वाजता चंद्र  कुंभ राशीतून मीन राशीत संक्रमण करणार आहे. कुंभ राशीत आधीपासून शनिदेव विराजमान असल्याने इथे चंद्र शनिची भेट होणार आहे. या भेटीमुळे काही राशींवर नकारात्मक परिणाम दिसणार आहेत.  (vish yog 2023 formed by the combination saturn and moon shani chandra yuti negative impact these zodiac sign)


या संयोगामचा सर्वात वाईट स्थान चौथ्या, 8व्या आणि 12व्या घरात आहे. पण कुंडलीतील इतर घरांवरही त्याचा वाईट परिणाम दिसणार आहे. या योगामुळे जाचकावर मानसिक तणाव, निराशा, चिंता, नैराश्य आणि आर्थिक संकट कोसळणार आहे. सध्या चंद्र सिंह राशीत आहे. 



वृषभ (Taurus) 


विष योगामुळे तुमच्या व्यावसायिकावर वाईट परिणाम होणार आहे. तुमचं कार्याक्षेत्रातील सहकार्याशी संबंध बिघण्याची शक्यता आहे. नोकरी किंवा व्यवसायात आर्थिक अडचणी निर्माण होणार आहे. वरिष्ठांसोबत वादावादी होण्याची भीती आहे. 


कर्क (Cancer)


विष योगामुळे या व्यक्तींना अपघात, दुखापत किंवा अचानक वाईट घटना घडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या राशीच्या लोकांना अचानक अनपेक्षित आणि आव्हानात्मक परिस्थितींचा सामना करावा लागणार आहे. ज्यामुळे तुमच्या जीवनात भूकंप येणार आहे. आर्थिक स्थिती गडबडणार आहे. 


सिंह (Leo)


विष योगामुळे वैवाहिक जीवनात आणि व्यवसायात मोठा भूकंप येणार आहे. अनेक अडचणीचा सामना करावा लागणार आहे. आर्थिक समस्यांना वाढणार आहेत. त्यामुळे आयुष्यात अनेक संकटांचा सामना करावा लागणार आहे. वैयक्तिक आयुष्यातील अस्थिरता पाहून तुम्ही निराश होणार आहात. 


कुंभ (Aquarius) 


विष योगामुळे या राशीच्या मानसिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम होणार आहे. अनावश्यक चिंता आणि तणावमुळे तुम्ही ग्रासले असणार आहात. कोणतेही काम पूर्ण होण्यास विलंब लागणार आहे. अनेक अडचणींचा सामना तुम्हाला करावा लागणार आहे. वैवाहिक जीवनातही नकारात्मक वादळ येणार आहे. वाद विवाद होण्याची शक्यता आहे. 


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)