Vish Yog : ज्योतिषशास्त्रानुसार चंद्र आणि शनि यांच्या संयोगाने विष योग झालाय. 9 जून रोजी सकाळी 06.02 वाजता चंद्राने कुंभ राशीत प्रवेश केला. यापूर्वी चंद्र मकर राशीमध्ये होता. दरम्यान यावेळी या राशीमध्ये शनि देखील आहे. अशा स्थितीत दोन्ही ग्रहांच्या युतीमुळे विष योग तयार झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शनि आणि चंद्राची युती होईल, ज्यामुळे विष योग देखील तयार झाला असून हा विष योग हा ज्योतिषशास्त्रामध्ये अशुभ मानला जातो. या अशुभ योगाचा कोणत्या राशीच्या लोकांना त्रास होणार आहे, याची आपण माहिती घेऊया. या काळामध्ये या राशीच्या व्यक्तींना आर्थिक समस्यांना सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे. 


कन्या रास


विष योगामुळे कन्या राशींच्या व्यक्तींच्या आयु्ष्यात काही समस्या निर्माण होऊ शकतात. या काळामध्ये आरोग्याबाबत सावध राहावं लागणार आहे.  मुलांच्या करिअरसाठी काही समस्यां येणार आहेत. या दीड दिवसांमध्ये शत्रूही व्यक्तीवर वर्चस्व गाजवू शकणार आहे. कुटुंबामध्ये काही वाद असतील ते ते वाढणार नाहीत, याकडे लक्ष द्यावं.


वृश्चिक रास


वृश्चिक राशीच्या व्यक्तींना विष योगामुळे आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. या काळामध्ये वैयक्तिक आणि कामाच्या ठिकाणी अडचणी येऊ शकतात. कोणत्या व्यक्तींशी काही मतभेद असतील तर ते सोडवण्याचा प्रयत्न करावा. बिझनेसमध्ये मोठं नुकसान होण्याचीही शक्यता आहे. 


कुंभ रास


या राशीमध्ये विष योग तयार होत असल्याने याच राशीच्या लोकांच्या आयुष्यात अनेक समस्या उद्भवू शकतात. या काळामध्ये तुमची नोकरी जाण्याचीही शक्यता वर्तवण्यात येतेय. आरोग्याची खास विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. तुमच्या अहंकारावर नियंत्रण ठेवावं लागेल, अन्यथा ते धोकादायक ठरणार आहे. नोकरदार लोकांनी कामाच्या ठिकाणी थोडे सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे.


( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )