Diwali 2022: दिवाळीत या 3 लक्ष्मी मंदिरांना द्या भेट , होईल तुमची भरभराट
दिवाळीला लक्ष्मी देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी तुम्ही 3 प्रसिद्ध लक्ष्मी मंदिरांना भेट देऊ शकता.
Diwali 2022: दिवाळीला देवी लक्ष्मीची विशेष पूजा केली जाते. भक्त देवी धनलक्ष्मीकडून धन आणि अन्नाची मागणी करतात. देवी लक्ष्मीच्या कृपेनेच ऐश्वर्य आणि वैभव प्राप्त होते. यामुळेच देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी भाविक देवी लक्ष्मीची पूजा करतात. (Visit these 3 Lakshmi temples on Diwali 2022 nz)
यंदा दिवाळी २४ ऑक्टोबरला आहे. भगवान श्रीराम या दिवशी लंकेत रावणाचा वध करून अयोध्येत परतलेले. त्यांच्या स्वागतासाठी अयोध्येत दिव्यांची रोषणाई करण्यात आली. तेव्हापासून या सणाला दीपोत्सव असेही म्हणतात. अशा परिस्थितीत दिवाळीला लक्ष्मी देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी तुम्ही 3 प्रसिद्ध लक्ष्मी मंदिरांना भेट देऊ शकता.
आणखी वाचा - पाकिस्तानात आहे 5000 वर्ष जुने हिंदू मंदिर...जाणून घ्या इतिहास
लक्ष्मीनारायण मंदिर, दिल्ली (Laxminarayan Temple, Delhi)
या दिवाळीत तुम्ही दिल्लीतील लक्ष्मीनारायण मंदिराला भेट देऊ शकता. हे मंदिर बिर्ला मंदिर म्हणूनही प्रसिद्ध आहे. या मंदिराचे उद्घाटन महात्मा गांधींच्या हस्ते झाले. गोल मार्केटजवळील मंदिर मार्गावर लक्ष्मी नारायण मंदिर आहे. हे मंदिर दिल्लीतील प्रमुख आकर्षणांपैकी एक आहे आणि येथे दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. या मंदिरात लक्ष्मी विष्णूसोबत विराजमान आहेत. हे मंदिर उद्योगपती आणि परोपकारी बलदेव दास बिर्ला आणि बिर्ला कुटुंबातील त्यांचा मुलगा जुगल किशोर बिर्ला यांनी बांधले होते. त्यामुळे या मंदिराला बिर्ला मंदिर असेही म्हणतात.
महालक्ष्मी मंदिर, कोल्हापूर (Mahalakshmi Temple, Kolhapur)
महालक्ष्मी मंदिर हे महाराष्ट्रातील कोल्हापूर येथे असलेले एक अतिशय प्रसिद्ध आणि जुने मंदिर आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक येथे येतात. हे मंदिर सातव्या शतकात चालुक्य शासक कर्णदेवाने बांधले होते. नंतर 9व्या शतकात शिलाहार यादव यांनी मंदिराची पुनर्बांधणी केली. महालक्ष्मी मंदिराच्या गर्भगृहात 40 किलो वजनाची लक्ष्मीची मूर्ती आहे, ज्याची लांबी 4 फूट आहे. ही मूर्ती सुमारे 7,000 वर्षे जुनी असल्याचे सांगितले जाते. मंदिराविषयी असे म्हटले जाते की वर्षातून दोनदा सूर्याची किरणे थेट लक्ष्मीच्या मूर्तीवर पडतात. मंदिराच्या भिंतीवर एक श्रीयंत्र देखील आहे. मंदिरात असलेल्या पश्चिमेकडील भिंतीच्या खिडकीतून सूर्याची किरणे प्रवेश करतात. मूर्तीवर हिरे-रत्नांनी जडलेला मुकुट आहे. आईची मूर्ती काळ्या पाषाणाची आहे. या दिवाळीत तुम्ही या मंदिरात दर्शनासाठी जाऊ शकता.
आणखी वाचा - Work From Home नंतर आता Work From Pub सुरू होणार, कर्मचाऱ्यांना 'या' जबरदस्त ऑफर्स!
महालक्ष्मी मंदिर, मध्य प्रदेश (Mahalakshmi Temple, Madhya Pradesh)
या दिवाळीत तुम्ही मध्य प्रदेशातील महालक्ष्मी मंदिराला भेट देऊ शकता. हे मंदिर खूप प्रसिद्ध आहे. हे प्रसिद्ध मंदिर 1832 च्या सुमारास बांधले गेले. हे मंदिर इंदूरमध्ये आहे. दिवाळीच्या दिवशी या मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होते आणि देवी लक्ष्मीची विशेष पूजा केली जाते.