Gemstone: जन्मतारखेवरून परिधान करा तुमचं शुभ रत्न, कसं असतं अंकशास्त्राचं गणित वाचा
Gemstone Numerology: ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह आणि महादशा-अंतर्दशा यांचा आपल्या जीवनावर परिणाम होत असतो. ज्योतिषशास्त्रात ग्रहांची स्थिती पाहून रत्न किंवा उपरत्न सूचवलं जातं. त्यामुळे कमकुवत असलेल्या ग्रहाशी रत्नाद्वारे संपर्क साधून फळ प्राप्ती केली जाते.
Gemstone Numerology: ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह आणि महादशा-अंतर्दशा यांचा आपल्या जीवनावर परिणाम होत असतो. ज्योतिषशास्त्रात ग्रहांची स्थिती पाहून रत्न किंवा उपरत्न सूचवलं जातं. त्यामुळे कमकुवत असलेल्या ग्रहाशी रत्नाद्वारे संपर्क साधून फळ प्राप्ती केली जाते. अंकशास्त्रातही जन्म तारखेची आकडेमोड करत रत्न सुचवले जातात. असं असलं तरी ज्योतिषशास्त्र आणि अंकशास्त्राचं सखोल ज्ञान असलेल्या व्यक्तीकडून सल्ला घेणं गरजेचं आहे. तुमच्या जन्मतारखेवरून कोणतं रत्न शुभ फळ देईल याबाबत सांगितलं जातं. राशी आणि मूलांकानुसार रत्न धारण केल्यास धन, सुख, संपत्ती यात यश मिळतं. मूलांक आपल्या जन्म तारख असते. जसं की 1 तारीख असल्यास 1 मूलांक असतो. तर 10 ही तारीख असल्यास 1+0=1 मूलांक असतो. 29 तारीख असल्यास 2+9=11 म्हणजेच 1+1=2 अर्थात 2 हा मूलांक असेल.
जन्म तारीख आणि शुभ रत्न
मूलांक 1: ज्या जातकाची जन्मतारीख 1, 10, 19 किंवा 28 असते. त्या जातकांचा मूलांक 1 असतो. 1 या अंकावर सूर्याचं वर्चस्व आहे. त्यामुळे सूर्याचं रत्न माणिक्य घालण्याचा सल्ला दिला जातो. माणिक रत्नामुळे शुभ फळ मिळतं.
मूलांक 2: महिन्यातल्या 2, 11, 20 आणि 29 या तारखेला जन्म झाल्यास 2 हा मूलांक येतो. या अंकावर चंद्राचं प्रभुत्व आहे. त्यामुळे मोती धारण करणं शुभ ठरतं. मोती चंद्राचं प्रतिनिधित्व करतं. तसेच चांदीत परिधान करावं.
मूलांक 3: कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21 आणि 30 या जन्मतारखेचा मूलांक 3 तीन येतो. अंकशास्त्रानुसार या अंकावर गुरुचं प्रभुत्व आहे. त्यामुळे पुष्कराज हे रत्न शुभ ठरतं. पुष्कराज सोन्यात परिधान करून घालावं.
मूलांक 4: 4, 13, 22 आणि 31 या तारखेचा मूलांक 4 येतो. अंकशास्त्रानुसार 4 अंकावर राहुचं प्रभुत्व आहे. त्यामुळे या मूलांकाच्या जातकांनी नीलम किंवा गोमेद रत्न परिधान करावं. तसेच पंचधातुची अंगठी परिधान करणं फलदायी ठरतं.
मूलांक 5: महिन्यातील 5, 14 आणि 23 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 5 येतो. या मूलांकावर बुध ग्रहाचं अधिराज्य आहे. या जातकांनी पन्ना हे शुभ रत्न परिधान करावं.
बातमी वाचा- Budh Gochar 2023: बुध गोचरामुळे तयार होणार त्रिकोण राजयोग, या तीन राशींना मिळणार लाभ
मूलांक 6: सहा या मूलांकावर शुक्र या ग्रहाशी निगडीत आहे. हिरा हे शुक्राचं रत्न आहे. त्यामुळे हे रत्न परिधान केल्यावर जातकाला प्रसिद्धी, प्रेम यात यश मिळतं.
मूलांक 7: जन्मतारीख 7 किंवा त्याची बेरीज 7 इतकी येत असल्यास जातकांवर केतुचा प्रभाव असतो. 7 मूलांक असलेल्या जातकांनी लसण्या हे रत्न परिधान करणं फलदायी ठरतं.
मूलांक 8: या मूलांकावर शनिचं प्रभुत्व आहे. शनि हे न्यायदेवता असून त्यांचं रत्न नीलम आहे. 8 मूलांक असलेल्या व्यक्तींनी नीलम रत्न परिधान केल्यास फायदा होईल.
मूलांक 9: 9, 18 आणि 27 या तारखेवर जन्म घेतलेल्या जातकांचा मूलांक 9 आहे. 9 या अंकावर मंगळाचं वर्चस्व आहे. त्यामुळे मंगळाचं रत्न असलेलं मूंगा घातल्यास फायदा होईल. मूंगा सोनं या धातून मढवून घातल्यास फलदायी ठरतो.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)