Budhwar Upay : बुधवारी करा `हे` उपाय, पैशांची समस्या होईल दूर
Astro Tips : अनेकांच्या आयुष्यात आर्थिक संकट असल्यामुळे वेगवेगळ्या समस्यांना सामोरं जावं लागतं. पैशांची चणचण असल्यास अनेक कामं होतं नाही. जर कुंडलीत बुध मजबूत असेल तर सगळं काही ठिक असतं असं शास्त्रात मानलं जातं.
Wednesday Tips For Money : आर्थिक संकट किंवा पैसा येतो पण तो टिकत नाही. अशात अनेक समस्यांना आपल्याला तोंड द्यावं लागतं. आर्थिक गणितावर आपल्या आयुष्याची घडी अवलंबून असते. त्यामुळे जर तुम्हाला सतत आर्थिक संकटाला तोंड द्यावं लागतं असेल, बुधवारी काही उपाय केल्यास तुमची समस्या दूर होऊ शकते. हिंदू धर्मात प्रत्येक दिवस कोणत्या ना कोणत्या देवाला समर्पित केला आहे. बुद्धी देवतेचा वार म्हणून बुधवारला महत्व आहे. बुध हा बुद्धिमत्ता, एकाग्रता, वाणी, त्वचा, सौंदर्य आणि सुगंध यांचाही कारक आहे. बुद्धीची देवता गणेश आहेत. त्यामुळे बुधवारी गणेश उपासना करणे अत्यंत महत्वाचं मानलं जातं.
'हे' उपाय करा
बुधवारी गणेशाची पूजा करताना गुलाल अर्पण करावा. गणेशाला गुलाल अर्पण केल्यामुळे तुमच्या समस्यांचं निराकरण होईल. ज्या कार्याचा प्रारंभ करू त्यात यश मिळते. गणपतीला दुर्वा खूप प्रिय आहे. दुर्वा अर्पण केल्याने प्रत्येक इच्छा पूर्ण होते. किमान 21 दुर्वा अर्पण कराव्या. यानंतर नैवेद्य दाखवावा. सलग 5 बुधवार ही पूजा केल्यास तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण होईल. (Wednesday Tips For Money Budhwar Upay Do this solution on Wednesday money problem will be removed marathi news)
बुधवारी गणेश रुद्राक्ष धारण केल्यास चांगले परिणाम मिळतात. रुद्राक्ष धारण करण्यापूर्वी ते दुधात घालून मंदिरात ठेवा. त्याची यथायोग्य पूजा करून नंतर ते धारण करा. रुद्राक्ष धारण केल्याने प्रत्येक अडथळा दूर होतो.
बुधदोष लोकांनी 'हे' करावं
बुधदोष असलेल्या व्यक्तींनी दुर्गा देवीची पूजा करावी. 'ओम ह्रीं क्लीं चामुंडयै विचार' या मंत्राचा दररोज 5, 7, 11, 21 किंवा 108 वेळा जप केल्याने बुद्ध दोष नाहीसा होतो.
'या' गोष्टी दान कराव्यात
बुधवारी हिरव्या भाज्या, डाळी, हिरवे कपडे अशा वस्तू गरिबांना दान करा. हिरव्या वस्तू दान केल्याने पैशा संबंधित समस्या संपतात.
'हे' नक्की करा
बुध कमजोर असेल तर नेहमी हिरवा रुमाल सोबत ठेवा.
बुध ग्रहाचा अशुभ प्रभाव कमी करण्यासाठी घराच्या पूर्व दिशेला लाल ध्वज लावावा.
बुधवारी गायीला हिरवे गवत खाऊ घातल्याने देवाचा आशीर्वाद मिळून सर्व गोष्टी प्राप्त होतात.
बुध देवाची पूजा सलग तीन बुधवारी पूजा केल्यास शक्ती, संपत्ती आणि आनंद प्राप्त होतो.
बुधवारी 'हे' काम करू नका
बुधवारी पान खरेदी किंवा सेवन करू नये, तसंच सुपारी घेऊन घरात येऊ नये. या गोष्टी जीवनात दारिद्र्य आणतात.
बुधवारी चुकूनही कोणत्याही किन्नरचा अपमान करु नये. या दिवशी किन्नरांना दान करावे. किन्नरांचा अपमान केल्याने माता लक्ष्मी नाराज होते.
बुधवारी महिला आणि मुलांचा अपमान करणे टाळणे. त्यांच्याविरूद्ध काहीही चुकीचे बोलू नये. या दिवशी शक्य आपल्यापेक्षा मोठ्या महिलांच्या पाया पडावे तर लहान मुलीला भेटवस्तू द्यावी.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य समजुती आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)