आठवडाभर `या` 5 राशीच्या व्यक्तींची मज्जाच मज्जा, तर काहींना होणार मोठा धनलाभ
या आठवड्यात 3 राशीच्या लोकांचा प्रवास घडू शकतो. तर काही राशीच्या लोकांना कुंटूंबाबरोबर भरपूर वेळ घालवता येणार आहे.
मुंबई : 5 राशी च्या लोकांना या आठवड्यात भरपूर धनलाभ होणार आहे. तर काही राशीच्या लोकांना शत्रुंपासून धोका उत्पन्न होऊ शकतो. जाणून घेऊ या सर्व राशींचे भविष्य...
मेष (Aries): या आठवड्यात लहानपणीची एखादी व्यक्ती आठवणींनी किंवा एखाद्या भेटवस्तूने तुम्हाला आनंद देईल.
वृषभ (Taurus):या आठवड्यात तुम्हाला आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतील. वैवाहिक जीवनात काही कलह निर्माण होऊ शकतात. धार्मिक कार्याचे आयोजन कराल. विद्यार्थ्यांसाठी आनंदी काळ असेल.
मिथुन (Gemini):भावनिक होऊन कोणतेही निर्णय घेऊन नका. या आठवड्यात आर्थिक स्थिती सामान्य राहील. परंतू आठवड्याच्या शेवटच्या दिवसांमध्ये धनलाभ होऊ शकतो. वैवाहिक जीवनात आनंदी राहाल. सासुरवाडीकडून चांगली बातमी मिळू शकेल.
कर्क (Cancer): या आठवड्यात मानसिक त्रास उद्भवू शकतो. परंतू महत्वाचे कार्य पूर्ण होईल. कुटूंबात कलह होऊ नये म्हणून अतिरिक्त बोलणे टाळा. लहान मुलांच्या आरोग्याची काळजी घ्या.
सिंह (Leo): या आठवड्यात तुम्ही तुमच्याच परिघात मग्न राहाल. धार्मिक कार्यासाठी प्रवास शक्य होईल. व्यवसायात चांगला नफा होईल. नोकरदारांना आनंदाची बातमी मिळेल.
कन्या (Virgo): घरात मंगलकार्य सफल होईल. नोकरदारांना कुटूंबासोबत जास्त वेळ घालवता येईल. उद्योग व्यवसायातील अडचणी सुटतील. परंतू आर्थिक स्थिती सामन्य असेल.
तुळ (Libra): या राशीच्या लोकांनी अत्यंत काळजीपूर्वक निर्णय घेणे गरजेचे आहे. अन्यथा मोठे नुकसान होऊ शकते. कौटुंबिक वातावरण आनंदी राहिल. आरोग्याच्या काही समस्या जाणवू शकतात. आर्थिक स्थिती चांगली राहिल.
वृश्चिक (Scorpio): या आठवड्यात पदोन्नती मिळू शकते. प्रेम प्रकरणात आनंदाचे क्षण अनुभवता येतील. अडलेली कामे पूर्ण होतील. विद्यार्थ्यांना नवीन गोष्टी शिकता येतील.
धनु (Sagittarius): नोकरदार या आठवड्यात काम अधिक सक्रीय राहतील. मानसिक त्रास उद्भवू शकतो. आर्थिक स्थिती चांगली राहिल. कौटुंबिक कलहापासून लांब रहा.
मकर (Capricorn):एखाद्या समस्या चर्चेद्वारे सोडवण्याचा प्रयत्न करा. संतप्त भावनेच्या भरात भांडू नका. अन्यथा मोठ्या अडचणींना सामोरे जावं लागेल. वैवाहिक जीवन आनंदी राहिल. आरोग्याच्या समस्या जाणवू शकतील. पाल्यांकडून काही चांगली बातमी मिळू शकते.
कुंभ (Aquarius): या आठवड्यात आत्मविश्वासाने अडचणींना सामोरे जाल. वैवाहिक जीवनात आनंदी राहाल. व्यवसायिकांना आनंदाची बातमी मिळेल.
मीन (Pisces): गैरसमाजातून तुमचे विरोधक अडचणी निर्माण करू शकतात. प्रवासावेळी काळजी घ्या. या आठवड्यात धन लाभ होऊ शकतो.
(Disclaimer:येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. झी24तास याची याची पुष्टी करत नाही.)