4 राशीच्या लोकांचं नशीब बदलणार हा आठवडा, तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या
या 4 राशींचे लोक शत्रूंवर विजय मिळवतील, फायदा होईल; पुढचा आठवडा कसा असेल जाणून घ्या
मुंबई : या आठवड्यात न्यायाची देवता शनिदेवाने स्वतःच्या राशीत स्थान केले आहे. याशिवाय सूर्य आणि बुधही या राशीत आहेत. या स्थितीचा सर्व राशींवर जबरदस्त प्रभाव पडेल. 24 जानेवारी ते 30 जानेवारी हा काळ मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ राशीच्या लोकांसाठी कसा असेल, हे खगोल गुरु बेजान दारूवाला यांचे पुत्र चिराग दारूवाला यांच्याकडून जाणून घ्या.
मेष : या आठवडय़ात उद्योग-व्यवसायात वाढ होईल. चांगला वेळ घालवला जाईल. नवीन लोकांशी संवाद वाढेल आणि त्यांच्याशी व्यावसायिक संपर्क प्रस्थापित होईल. या आठवड्यात कुटुंबातील सदस्य आणि मित्रांकडून सर्व शक्य सहकार्य आणि मदत मिळेल.
वृषभ : या आठवड्यात कामाशी संबंधित नवीन योजना करण्यात यशस्वी व्हाल. मोठे व्यापारी किंवा अधिकारी यांच्याशी चांगले संबंध प्रस्थापित कराल.
मिथुन : या आठवड्यात तुम्ही अशुभ परिस्थितींवर विजय मिळवाल. तुम्ही तुमच्या शत्रूंचा पराभव कराल. कुटुंबासोबत चांगला वेळ जाईल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. या काळात तुम्हाला रिअल इस्टेटमधून चांगले फायदे मिळतील.
कर्क : या आठवड्यात तुम्हाला चांगली बातमी मिळेल. ओळखीच्या लोकांसोबत चांगला वेळ घालवाल. सरकारी कामे कोणत्याही व्यत्ययाशिवाय पूर्ण होतील. या आठवड्यात नशीब चांगले राहणार आहे.
सिंह : हा आठवडा चांगला आहे. प्रवासाचीही संधी मिळेल. कुटुंबात शुभ कार्य होतील. तुमच्या हुशारीने तुम्हाला कामात यश मिळेल. या आठवड्यात तुम्ही तुमच्या विरोधकांवर विजय मिळवू शकाल.
कन्या : या आठवड्यात तुम्हाला राजकारणात यश मिळवण्याच्या संधी मिळू शकतात. आर्थिक लाभ मिळणार आहेत.
तूळ : हा आठवडा संमिश्र स्वरुपाचा असणार आहे. तुम्हाला तुमच्या रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. तुमच्या स्वभावात आणि वागण्यात परिपक्वता दिसून येईल. वैवाहिक जीवन चांगले राहील. आरोग्याच्या समस्या जाणवण्याची शक्यता आहे.
वृश्चिक : कामाच्या ठिकाणी मान सन्मान मिळेल. उच्च वर्गातील लोकांशी चांगले संबंध प्रस्थापित होतील. राजकारणात तुमचे आकर्षण असेल, परंतु राजकारणात गुंतलेल्या लोकांशी तुम्ही थोडे सावध राहावे, संकटे निर्माण होतील.
धनु : या आठवड्यात व्यवसायात यश मिळणार नाही. आपल्या सवयी बदलणे आवश्यक आहे. कुटुंबाबाबत चांगली बातमी मिळाल्याने आनंदाचे वातावरण राहील.
मकर : खर्चात वाढ होणार आहे. तुम्हाला तुमचे मित्र आणि सहकाऱ्यांकडून शक्य ते सर्व सहकार्य मिळेल. या आठवड्यात तुमचा कल धार्मिक कार्यांकडे असेल. कुटुंबाकडून आनंद आणि सहकार्य चांगले राहील.
कुंभ : आरोग्य चांगलं राहणार नाही. मानसिक तणाव वाढेल. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी तुमचे चांगले संबंध राहतील. आपल्या क्षेत्रात प्रगती होऊ शकते.
मीन : तुमचे व्यक्तिमत्व प्रभावी राहील. संभाषण कौशल्य आणि चपळाई वापरून तुम्ही तुमची कामे पूर्ण कराल. या आठवड्यात काही चांगल्या बातम्या मिळतील.