मुंबई : नव्या वर्षाची सुरुवात चांगली व्हावी असं प्रत्येकाला वाटत असतं. नव्या वर्षातील पहिला आठवडा तुमच्यासाठी कसा असणार आहे हे जाणून घेणं फार महत्त्वाचं असणार आहे. खगोल गुरु बेजान दारूवाला यांचा मुलगा खगोल मित्र चिराग दारूवाला यांच्याकडून जाणून घेऊया मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन राशीसाठी कसा असणार हा नवा आठवडा.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मेष (Aries): आर्थिक स्थिती सुधारेल. या राशीच्या व्यक्तींचं उत्पन्न वाढणार आहे. काही दिवस शांततेत घालवता येतील. तंदुरुस्त राहू शकता. आपण या कालावधीमध्ये शांत राहाणं गरजेचं आहे. 


वृषभ (Taurus): लोकांशी चांगले संबंध ठेवा आपल्यासाठी ते गरजेचं आहे. मित्र आणि शुभचिंतक आपल्यासोबत असणार आहेत. व्यावसायिक स्तरावर आपला मान सन्मान वाढेल. 


मिथुन (Gemini): कोणताही निर्णय घेण्याआधी सद्यस्थिती लक्षात ठेवणे आवश्यक आहे. व्यावसायिक स्तरावरील समस्या सोडवण्यासाठी तुम्हाला बक्षीस मिळू शकते. नवविवाहित जोडपे त्यांच्या वैवाहिक जीवनाचा पुरेपूर आनंद घेऊ शकतील. प्रेमासाठी हा दिवस खूप चांगला आहे. 


कर्क (Cancer): आपल्याला आपली परिस्थिती सुधारण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागणार आहेत. या आठवड्यात आपण सोन्यात गुंतवणूक करू शकता. तुम्ही पूर्ण केलेल्या कामाचं कौतुक होऊ शकतं. 


सिंह (Leo): तुम्ही आपल्या नियोजनात व्यस्त असाल. कर्जाची परतफेड करणं गरजेचं आहे. मित्रांसोबत आपला दिवस खूप चांगला जाईल. आर्थिक बजेट कोलमडण्याची स्थिती आहे ते सांभाळणं गरजेचं आहे. 


कन्या (Virgo): व्यवसाय किंवा कामाच्या ठिकाणी तुमचं कौतुक होईल. तुम्हाला चांगलं काम करण्याची प्रेरणा मिळेल. प्रिय व्यक्तीकडून आपल्याला सकारात्मक ऊर्जा मिळणार आहे. मार्केटिंग क्षेत्रात आपलं काम खूप चांगलं होईल. 


तुला (Libra): या आठवड्यात तुमची मन: स्थिती खराब राहू शकते. त्याचा परिणाम तुमच्या आजूबाजूच्या लोकांवर होणार आहे. घरातील वातावरण बिघडू शकतं. तुमचे गैरसमज लवकर दूर होणं आवश्यक आहे. 


वृश्चिक (Scorpio): तुम्ही आयुष्याच्या अद्भुत टप्प्यात आहात. नोकरीच्या उत्तम संधी तुम्हाला मिळणार आहेत. तुम्ही पुढच्या काळात खूप यश मिळवणार आहात. आरोग्य चांगलं राहणार आहे. विवाहाचे मुहूर्त आहेत त्यामुळे विवाह करण्यासाठी हा योग्य काळ आहे. 


धनु (Sagittarius): तुम्हाला चांगलं काम मिळण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी आपला वेळ चांगला असणार आहे. आजारी लोकांना आज आरामाची खूप आवश्यकता आहे. 


मकर (Capricorn): कामाच्या ठिकाणी पटकन कोणावर विश्वास ठेवू नका. येणाऱ्या संधीचा उत्तम वापर करणं आवश्यक आहे. कोणत्याही प्रसंगाला धीरानं सामोरं जा. आरोग्याच्या बाबतीत थोडी काळजी घेणं आवश्यक आहे. 


कुंभ (Aquarius): स्मार्ट वर्क करण्यावर जास्त भर द्या. कुटुंबाच्या पाठींब्यामुळे आपण कोणत्याही ठिकाणी तारुन जाल. तुमचा आत्मविश्वास ढळू देऊ नका. वरिष्ठांसोबत चांगले संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करा. 


मीन (Pisces): नोकरीच्या आणि नव्या कामाच्या संधी मिळतील. ज्या पैशाची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होता, अखेर आता ती संधी येणार आहे. तुम्हाला लवकरच पैसे मिळू शकतात. 


(विशेष सूचना: या लेखात दिलेली माहिती सामान्य गृहीतकं आणि माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची पुष्टी करत नाही.)