साप्ताहिक आर्थिक राशीभविष्य (13 ते 19 नोव्हेंबर 2023) : दिवाळीचा दुसऱ्या आठवडा `या` राशींसाठी धनलाभ, तर यांनी घ्या गुंतवणूक करताना काळजी
Weekly Horoscope Career Prediction : लक्ष्मीपूजनानंतर हा आठवडा पाडवा, बलिप्रतिपदा आणि भाऊबीज सणाचा आहे. त्यात सूर्य गोचरमुळे हा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या.
Weekly Career Horoscope 13 to 19 November 2023 : दिवाळीचा हा दुसरा आठवडा अनेक राशींसाठी खास ठरणार आहे. लक्ष्मीपूजनाला 700 वर्षांनंतर अनेक राजयोग आणि या आठवड्यात होणारा सूर्य संक्रमण हे धनयोग घेऊन आला आहे. हा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या तुमचं साप्ताहिक आर्थिक राशीभविष्य. (weekly horoscope money career prediction 13 to 19 november Diwali Padwa and Bhai Dooj and diwali 2023 arthik rashi bhavishy zodiac sign)
मेष (Aries Zodiac)
या राशीच्या लोकांना करिअरमध्ये प्रगती होणार आहे. तुमची रखडलेले प्रकल्प पुन्हा सुरु होणार आहेत. आर्थिक बाबतीत अनावश्यक वाद या आठवड्यात टाळलेला बरा असेल. नाही तर तुम्हाला आर्थिक फटका बसू शकतो. या आठवड्यातील प्रवास तुमच्यासाठी शुभ ठरणार आहे. आठवड्याच्या शेवटी विचारपूर्वक निर्णय घ्या.
शुभ दिवस: 13,15
वृषभ (Taurus Zodiac)
या राशीच्या लोकांना कामाच्या ठिकाणी चढ उतार सहन करावा लागणार आहे. गुंतवणूक करताना लक्षपूर्वक करा. या आठवड्यात काही वाद होऊ शकतात. ते वाटाघाटी करुन सोडवा तुमच्यासाठी ते हिताचे ठरतील. कामाच्या ठिकाणी तुमचं कौतुक होणार असून तुमचा मान सन्मान वाढणार आहे.
शुभ दिवस: 13,14
मिथुन (Gemini Zodiac)
या राशीच्या लोकांना या आठवड्यात नशिबाची साथ मिळणार आहे. कोणत्याही बदलाबद्दल मन अस्वस्थ होऊ शकतं. कामाच्या ठिकाणी तणाव जाणवणार आहे. तुम्हाला आर्थिक फायदा होणार आहे. कुटुंबातील परस्पर संबंधांमध्ये समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. धार्मिक कार्यक्रात रुची वाढणार आहे.
शुभ दिवस: 16,17
कर्क (Cancer Zodiac)
या राशीच्या लोकांसाठी आर्थिक लाभसोबत गुंतवणुकीतून तुम्हाला लाभ होणार आहे. मात्र या आठवड्यातील प्रवास पुढे ढकला. ऑफिसमध्ये अहंकारामुळे समस्या वाढू शकतो. त्यातून तुम्हाला नुकसानीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. एखादी छोटी चूक सुद्धा भविष्यात तुमच्या अंगाशी येऊ शकते.
शुभ दिवस: 13,15
सिंह (Leo Zodiac)
या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा चांगला असणार आहे. आर्थिक फायद्यासाठी हा आठवडा तुम्हाला अनेक मार्ग दाखविणार आहे. अगदी प्रवासातूनही शुभ वार्ता मिळणार आहे. नातेसंबंधात प्रेम आणि आनंदी असा हा आठवडा असणार आहे.
शुभ दिवस: 14,16, 17
कन्या (Virgo Zodiac)
या राशीच्या लोकांसाठी कामाच्या ठिकाणी प्रगती होणार आहे. या आठवड्यात तुम्हाला प्रकल्प यशस्वी करण्यासाठी अनेक संधी प्राप्त होतील. आरोग्यामध्ये सकारात्मक परिणाम दिसून येतील. मात्र आठड्याच्या शेवटी मनं कुठल्या तरी कारणामुळे अस्वस्थ राहिल.
शुभ दिवस: 13, 14, 16
तूळ (Libra Zodiac)
या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा आर्थिकदृष्ट्या संमिश्र असणार आहे. तुमची अनेक कामं रखडणार आहेत. पैशांच्या व्यवहारात हा आठवडा त्रासदायक ठरणार आहे. मात्र प्रवासातून तुम्हाला सकारात्मक परिणाम दिसून येईल.
शुभ दिवस: 14, 16, 17
वृश्चिक (Scorpio Zodiac)
या राशीच्या लोकांनी या आठवड्यात नरम गरम असणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमचे वाद होण्याची भीती आहे. या आठवड्यात तुमचं बँक बॅलेन्स मजबूत स्थितीत असणार आहे. या आठवड्यातील प्रवास मात्र खर्चिक ठरणार आहे. आयुष्यात सुख आणि शांती असणार आहे. आठवड्याचा शेवट मन प्रसन्न करणारा असेल.
शुभ दिवस: 17
धनु (Sagittarius Zodiac)
या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा कामाच्या ठिकाणी प्रगती घेऊन आला आहे. हा आठवडा तुमच्यासाठी बिझी बिझी असणार आहे. आर्थिक बाबतीत हा आठवडा जरा टेन्शनचा असणार आहे. प्रवासातून शुभ परिणाम दिसून येईल.
शुभ दिवस: 14, 15, 16
मकर (Capricorn Zodiac)
या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा आर्थिक बाबतीत भाग्यशाली ठरणार आहे. या आठवड्यात तुम्हाला आर्थिक लाभाच्या अनेक संधी मिळणार आहे. संपत्ती वाढीसाठी मजबूत परिस्थिती निर्माण होणार आहे. या आठवड्यात तुमच्या मान सन्मान वाढणार आहे. कामाच्या ठिकाणी प्रगती होणार आहे.
शुभ दिवस: 14, 16
कुंभ (Aquarius Zodiac)
या राशीच्या लोकांसाठी आर्थिक बाबतीत हा आठवडा चांगला असेल. उत्पन्नाच्या अनेक संधी मिळणार आहे. कामाच्या ठिकाणी भावनिक कारणांमुळे अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कौटुंबिक बाबींमध्ये निराशा वाढू शकते. या आठवड्यापासून तुम्ही तुमच्या प्रवासाच्या शैलीत बरेच बदल आणू शकता. आठवड्याच्या शेवटी तुम्हाला अचानक एखादी चांगली बातमी मिळणार आहे.
शुभ दिवस: 14, 16, 17
मीन (Pisces Zodiac)
या राशीच्या लोकांना या आठवड्यात प्रवासाच्या अनेक संधी मिळणार असून तुम्हाला तो फायदेशीर ठरणार आहे. आर्थिक संबंधित बाबींमध्ये थोडं सावध राहा. हा आठवडा तुम्हाला खर्चिक ठरणार आहे. या आठवड्यात कामाच्या ठिकाणीही समस्या वाढणार आहे. तुम्हाला कोणत्याही कामात रस कमी होणार आहे.
शुभ दिवस: 14, 16
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)