Weekly Love Rashifal 27 March to 07 April 2023 in marathi : मार्चचा शेवटचा आठवडा आणि रामनवमीचा उत्साह (Ram Navami 2023) असा हा आठवड्यात बुध आणि गुरुचं (Guru Budh Gochar 2023) गोचर काही राशींसाठी फलदायी ठरणार आहे. 3 राशीच्या लोकांसाठी हा आठवड्यात भरपूर प्रेम असणार आहे. काहींच्या नशीबात लग्नाचं योग आहेत. चला तर इतर राशींसाठी हा आठवडा कसा असेल जाणून घेऊयात. 


मेष (Aries)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या राशीच्या लोकांच्या लव्ह लाइफमध्ये या आठवड्यात तणाव वाढणार आहे. परस्पर वाद आणि मतभेदामुळे तुमच्या लव्ह लाइफमध्ये समस्या निर्माण होतील. जोडीदाराशी वाद झाल्यामुळे तुम्हाला एकटेपणा जाणवेल. 


वृषभ (Taurus)


या राशीसाठी हा आठवड्या प्रेम संबंध मजबूत करणारा ठरणार आहे. तुम्ही घेतलेले निर्णय योग ठरतील. विवाह इच्छुकांचे लग्न ठरतील. मुलांची इच्छा असणाऱ्यांसाठी हा शुभ काळ असल्याचं ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलं आहे. 


मिथुन (Gemini)


या राशीच्या लोकांसाठी हा आठवड्या आनंदायी असणार आहे. त्यांचा लव्ह लाइफमध्ये अनेक रोमँटिक क्षण येणार आहे. घरातील ज्येष्ठ व्यक्तीमुळे तुमच्या प्रेमाला मान्यता मिळले. काहींच्या नशीबात विवाह योग आहेत. 


कर्क (Cancer)


या राशीच्या लोकांना लव्ह लाइफमध्ये प्रेमच प्रेम असणार आहे. वडीलधाऱ्यांचा आशीर्वादमुळे तुमच्या जीवनात आनंद असणार आहे. एकमेकांशी संवाद करा पण तो करताना गैरसमज होऊ नये याची काळजी घ्या. 


सिंह (Leo)


या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा जरा कठीण असणार आहे. प्रेम संबंधाबाबतीत उचलेले पाऊस तुमच्या आयुष्यात अडचणी निर्माण करतील. त्यामुळे लव्ह लाइफणद्ये अशांतता आणि अस्वस्थता वाढण्याची शक्यता आहे. 


कन्या (Virgo)


या राशीच्या लोकांची लव्ह लाइफ बदणार आहे. प्रेम संबंधात नवीन वारे वाहणार आहेत. जोडीदाराच्या तब्येतीकडे लक्ष देण्याची गरज आहे. आठवड्याच्या शेवटी लव्ह लाइफमध्ये आनंदाचे वातावरण असणार आहे. 



तूळ (Libra)


या राशीच्या लोकांसाठी हा आठवड्या प्रेमाने भरलेला असणार आहे. सुख समृद्धीचा योगायोग तुमच्या लव्ह लाइफ आनंदी करणार आहे. सुसंवाद हा परपस्परामधील प्रेम संबंध घट्ट करण्यास फायदेशीर ठरणार आहे. 



वृश्चिक (Scorpio)


या राशीच्या लोकांसाठी हा आठवड्या त्यांचा लव्ह लाइफसाठी अनुकुल असणार आहे. प्रेमात दिलेले आश्वासन या आठवड्यात पूर्ण होतील. तुमच्या प्रेमाची नवीन सुरुवात होणार आहे. हा आठवड्या तुमचं प्रेम जीवन मजबूत करणार आहे. 



धनु (Sagittarius)


या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा रोमँटिक असणार आहे. परस्परमधील प्रेम मजबूत होईल. आनंद आणि सुख तुमच्यासाठी प्रेमच प्रेम घेऊन येणार आहे. मात्र आठवड्याच्या शेवटी मन उदास होण्याची शक्यता आहे. 


मकर (Capricorn)


हा आठवड्या या राशीसाठी आनंदादायी असणार आहे. प्रेम मजबूत आणि घट्ट करणारा ठरणार आहे. जोडीदारासोबत रोमँटिक क्षण घालवणार आहात. कुटुंबात आनंदाचं वातावरण असणार आहे. 


कुंभ (Aquarius)


या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा शुभ असणार आहे. प्रेमासाठी हा आठवडा चांगला असणार आहे. जोडीदार तुमच्याकडे खूप लक्ष देईल. सकारात्मक गोष्टीमुळे प्रेमसंबंध अधिक मजबूत होईल. भविष्य घडविणारे विचार तुम्ही घेणार आहात. 



मीन (Pisces)


या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा जरा कठीण असणार आहे. प्रेममध्ये जरा संयमाने विचार करावा लागणार आहे. मन भावूक होण्याची चिन्ह आहेत. आठवड्याच्या शेवटी परस्पर संवाद साधल्यामुळे लव्ह लाइफ सुधारेल. 


(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)