Weekly Money Horoscope : 7 ऑगस्ट ते 13 ऑगस्ट 2023; शुक्र गोचरमुळे `या` राशींची करिअरमध्ये प्रगती आणि धनलाभ
Weekly Money Horoscope 7 to 13 August 2023 : आठवड्याची सुरुवात अतिशय शुभ होतेय. आज सोमवारी शुक्र कर्क राशीत असून त्यामुळे अनेक राजयोग जुळून आला आहे. त्यामुळे हा आठवडा अनेक राशींच्या करिअर आणि आर्थिकदृष्ट्या लकी ठरणार आहे.
Weekly Money Horoscope 7 to 13 August 2023 : आज सोमवार, ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्याला सुरुवात झाली आहे. आज शुक्र गोचर आणि त्यात सूर्य शुक्र संयोगामुळे अनेक राजयोग तयार झाले आहेत. त्यात आत चंद्रदेखील गोचर केलं आहे. कर्क राशी शुक्र असल्याने गजलक्ष्मी राजयोग (Gajlaxmi Rajyog) जुळून आला आहे. त्यामुळे अनेक राशींना धनलाभ होणार आहे. (weekly money career horoscope 7 to 13 august 2023 lucky zodiac signs get money success arthik rashi bhavishy shravan adhik maas 2023)
मेष (Aries)
या राशीसाठी हा आठवडा धनलाभाचा ठरणार आहे. आर्थिक स्थिती तुमची मजबूत होणार आहे. आरोग्याची समस्या दूर होणार आहे. या आठवड्यात प्रवास टाळा. कार्यक्षेत्राच्या ठिकाणी स्त्रीमुळे अडचणी येऊ शकता. या आठवड्यात कुठल्याही वादात अडकू नका.
शुभ दिवस : 5, 7, 9
वृषभ (Taurus)
या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा आर्थिक बाबतीत अनुकूल असणार आहे. हा आठवडा कामाच्या ठिकाणी शांतता जाणवेलय प्रकल्प पूर्ण करण्यासाठी तुम्हाला मदत मिळणार आहे. प्रवासातून समस्या वाढणार आहे. सर्वसमावेशक दृष्टिकोनाने पाहिल्यास तुम्हाला फायदा होईल.
शुभ दिवस: 6, 8, 11
मिथुन (Gemini)
मिथुन राशीच्या लोकांच्या करिअरमध्ये हा आवड्यात प्रगती घेऊन आला आहे. आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे. अचानक पैशांचा ओघ वाढणार आहे. गुंतवणुकीतून पैसा मिळणार आहे. कुटुंबात तणाव जाणवेल. काळजी घेतली तर घरात सुख समृद्धी नांदणार आहे. प्रवासातून समस्या निर्माण होईल.
शुभ दिवस: 8,9
कर्क (Cancer)
या राशीच्या लोकांच्या कार्यक्षेत्रात हा आठवडा प्रगती घेऊन आला आहे. रखडलेले प्रकल्प पुन्हा नव्या जोमाने मार्गी लागतील. आर्थिक बाबतीतही हा आठवडा धनलाभाचा आहे. या आठवड्यात प्रवास टाळणं तुमच्या हिताचं होईल. वडीलधाऱ्यांच्या आशीर्वादाने तुम्हाला जीवनात सुख-शांती लाभेल. आरोग्याची चिंता सतावू शकते.
शुभ दिवस: 7, 9
सिंह (Leo)
या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा आर्थिकदृष्ट्या फायदेशीर असणार आहे. या लोकांना धनलाभ होणार आहे. गुंतवणुकीसाठी हा आठवडा उत्तम आहे. या आठवड्यात तुम्ही उत्साही असणार आहात. प्रवास अशा व्यक्तीची भेट होईल जी भविष्यात तुमच्यासाठी शुभ ठरणार आहे. कार्यक्षेत्रातही चांगली प्रगतीचे योग आहेत.
शुभ दिवस: 9,10
कन्या (Virgo)
या राशीच्या लोकांच्या कार्यक्षेत्रात या आठवड्यात प्रगती घेऊन आला आहे. धनलाभाचे सुवर्ण योग जुळून आले आहेत. सुरुवातीच्या टप्प्यात कोणत्याही गुंतवणुकीबाबत शंका असणार आहे. पण पुढे गुंतवणूक केल्यास तुम्हाला फायदा होणार आहे. या आठवड्यात केलेल्या प्रवासातून यश प्राप्त होईल.
शुभ दिवस: 8,10
तूळ (Libra)
या राशीच्या लोकांसाठी आज कामाच्या ठिकाणी उत्तम परिस्थिती असणार आहे. तुम्हाला या आठवड्यात प्रकल्प पूर्ण करण्याच्या अनेक सुवर्ण संधी लाभणार आहे. पैसे मिळाल्यामुळे आर्थिक स्थिती सुधारणार आहे. कुटुंबात आनंदाचे वातावरण असणार आहे. या आठवड्यात प्रवास टाळा. आरोग्याची समस्या उद्भवू शकते. आवडत्या व्यक्तीचा सहवास लाभणार आहे.
शुभ दिवस: 8, 9, 11
वृश्चिक (Scorpio)
या राशीच्या लोकांच्या कार्यक्षेत्रात प्रगती होणार आहे. आर्थिक बाबतीतही हा आठवडा उत्तम असणार आहे. धनवृद्धीसाठी शुभ संयोग जुळून आले आहेत. गुंतवणूक करण्याचा विचार करणार आहात. आरोग्य उत्तम असणार आहे. मात्र प्रेमसंबंधात वादावादी होऊ शकते. बाहेर गावी जाणं टाळा, ते तुमच्यासाठी हिताचं असेल.
शुभ दिवस: 8, 9, 11
धनु (Sagittarius)
या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा आर्थिक दृष्टीकोनातून शुभदायक आहे. अचानक पैशांचा ओघ वाढणार आहे. कामाच्या ठिकाणी चढ उतार पाहिला मिळले. प्रकल्पांमध्ये अडथळे येतील. प्रवास त्रासदायक ठरणार आहे. कुठल्याही बाबतीत निष्काळजीपणा दाखवू नका.
शुभ दिवस: 8,11,13
मकर (Capricorn)
या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा संयमी आणि व्यवहारी असणार आहे. तरदुसरीकडे हा आठवड्या धनलाभाचाही आहे. मात्र कोणताही नवीन प्रकल्प तुमच्यासाठी त्रासदायक ठरणार आहे. या आठवड्यात केलेल्या प्रवासातून तुमच्यासाठी यशस्वी ठरणार आहे. कुटुंबात आनंदी वातावरण असणार आहे.
शुभ दिवस: 8,10
कुंभ (Aquarius)
या राशीच्या लोकांना आर्थिकदृष्ट्या चांगला असला तरी तुम्हाला तो कमी वाटेल. कामाच्या ठिकाणी त्रास सहन करावा लागणार आहे. अस्वस्थता जाणवणार आहे. कुटुंबाला दिलेली आश्वासने पूर्ण करण्यास तुम्ही अयशस्वी ठरणार आहात. प्रवासातून तुम्हाला यश मिळणार आहे. सप्ताहाच्या शेवटी सुख-समृद्धीचा शुभ संयोग आहेत.
शुभ दिवस: 8,11
मीन (Pisces)
या राशीच्या लोकांच्या कार्यक्षेत्रात प्रगतीचा मार्ग खुला होणार आहे. या आठवड्याच्या सुरुवातीलाच कुटुंबातून आनंदाची बातमी मिळणार आहे. या आठवड्यात प्रवासापूर्वी मन थोडे भीतीदायक असले. पण प्रत्यक्षात प्रवासातून सुंदर आठवणी अनुभवणार आहात. आर्थिक बाबतीत थोडी चिंता असेल. पण सप्ताहाच्या शेवटी सुख-समृद्धीचा सुंदर योग जुळून आल्यामुळे मनं प्रसन्न असणार आहे.
शुभ दिवस: 9, 13