Weekly Numerology 04 To 10 march 2024 : अंकशास्त्राच्या गणनेनुसार, मार्चच्या पहिल्या आठवड्यात अंक 5 चा स्वामी बुध मीन राशीत तर अंक 6 चा स्वामी शुक्र कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. या ठिकाणी शुक्र, सूर्य आणि शनीच्या संयोगात होणार आहे. अशा स्थितीत अंकशास्त्रानुसार अनेक लोकांची अपूर्ण कामं मार्चच्या या आठवड्यात पूर्ण होणार आहे. सुख-समृद्धी तुमच्या घरात नांदणार आहेत. तर काही मूलांकांच्या लोकांना चढ-उतारांना सामोरे जावं लागणार आहे. 1 ते 9 अंक असलेल्या सर्व लोकांसाठी मार्चचा पहिला आठवडा कसा असेल जाणून घेऊयात. (Weekly Numerology Predition 04 To 10 march 2024 Saptahik Ank jyotish Rashi Bhavishya in Marathi)


मूलांक 1


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मूलांक 1 असलेल्या लोकांसाठी मार्चचा पहिला आठवडा आर्थिक बाबतीत शुभ सिद्ध होणार आहे. त्यांच्या संपत्तीत वाढ होणार आहे. कामाच्या ठिकाणी अचानक समस्या उद्धभवणार आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या प्रोजेक्टवर काम करताना सावध राहा. प्रेम जीवनात परस्पर मतभेद होण्याची शक्यता आहे. कोणत्याही मुलाबाबत मतभेद होण्याची भीती आहे. आठवड्याच्या शेवटी तुम्हाला काही चांगली बातमी कानावर पडणार आहे. ज्यामुळे तुमचं मन प्रसन्न असणार आहे.


मूलांक 2


मूलांक 2 असलेल्या लोकांसाठी मार्चचा पहिला आठवडा आर्थिक बाबतीत शुभ असणार आहे. तुम्ही तुमच्या गुंतवणुकीवर जितके जास्त लक्ष केंद्रित कराल, तितके यश तुम्हाला मिळणार आहे. वैवाहिक जीवनात काही गैरसमज चालू असतील तर ते या आठवड्यात दूर होणार आहे. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या लग्नाचे प्रकरण पुढे जाणार आहे. संयमाने निर्णय घेतल्यावरच कामाच्या ठिकाणी प्रगती होणार आहे. आठवड्याच्या शेवटी, त्वरित निर्णय घेण्याची तुमची क्षमता तुमच्यासाठी चांगली बातमी घेऊन येणार आहे. 


मूलांक 3


मार्चच्या पहिल्या आठवड्यात 3 क्रमांक असलेल्या लोकांची अपूर्ण कामं मार्गी लागणार आहे. त्यांनाही सरकारी योजनांचा लाभ मिळणार आहे. आर्थिक दृष्टीकोनातून हा आठवडा शुभ राहणार असणार आहे. या आठवड्यात तुम्हाला आर्थिक लाभाच्या अनेक संधी मिळणार आहे. कामाच्या ठिकाणी हळूहळू सुधारणा होणार आहे. प्रकल्प वेळेत पूर्ण होणार आहे. या आठवड्यात तुम्ही तुमच्या प्रेम जीवनात केलेले प्रयत्न तुमच्यासाठी सुंदर भविष्यासाठी शुभ संधी निर्माण करणार आहे. या आठवड्याच्या शेवटी तुम्हाला एखाद्या गोष्टीबद्दल वाईट वाटून अधिक अस्वस्थता तुम्हाला होणार आहे. 


मूलांक 4


मार्चच्या पहिल्या आठवड्यात मूलांक 4 असलेल्या लोकांनी संयम ठेवून कोणताही निर्णय घ्या. कामाच्या ठिकाणी अहंकाराचे भांडण टाळले तर चांगल होईल. आर्थिक बाबींमध्ये मन थोडं अस्वस्थ असणार आहे. त्यामुळे घाईघाईने निर्णय न घेणेच चांगले होईल. लव्ह लाईफमध्ये अनावश्यक वाद टाळा, अन्यथा नात्यात दुरावा येण्याची शक्यता आहे. या आठवड्यात तुम्ही प्रवास पुढे ढकलल्यास चांगले परिणाम मिळतील. अन्यथा तुम्ही अनावश्यक तणावाखाली असणार आहात. सप्ताहाच्या शेवटी कुटुंबात काही धार्मिक कार्यक्रम होणार आहे. 


मूलांक 5


मार्चच्या पहिल्या आठवड्यात मूलांक 5 असलेल्या लोकांना अधिक प्रभावशाली लोकांची ओळख होणार आहे. ती लोक तुम्हाला भविष्यात फायदेशीर ठरणार आहे. लव्ह लाईफ रोमँटिक असणार आहे. नात्याबद्दल मन प्रसन्न असणार आहे. कामाच्या ठिकाणी काही बातम्या मिळाल्यानंतर तुम्हाला वाईट वाटणार आहे. तुम्ही तुमच्या कनिष्ठांच्या गरजा लक्षात घेऊन निर्णय घेतल्यास सकारात्मक परिणाम देणारा ठरणार आहे. अनावश्यक खर्चापासून दूर राहा अन्यथा तुमचे मासिक बजेट बिघडण्याची शक्यता आहे. सप्ताहाच्या शेवटी सुख-समृद्धीच्या योगायोगाने मन प्रसन्न राहणार आहे. 


मूलांक 6


मार्चच्या पहिल्या आठवड्यात मूलांक 6 असलेल्या लोकांसाठी कार्यक्षेत्रात चांगली प्रगती घेऊन येणार आहे. या आठवड्यापासून कालचक्र शुभ संयोग तुमच्या पक्षात असणार आहे. आठवड्याच्या उत्तरार्धात आर्थिक बाबतीत अचानक सुखद परिणाम देणार आहे. तुमच्या संपत्तीत वाढ होणार आहे. तुमच्या जोडीदारासोबत तुमचं संबंध चांगले राहणार आहे. तुम्ही भविष्याबाबत कोणताही निर्णय घेणार आहात. अविवाहित लोक या आठवड्यात कोणीतरी खास भेटणार आहे. आठवड्याच्या शेवटी कोणत्याही प्रकारचा बाह्य हस्तक्षेप तुमच्यासाठी त्रासदायक ठरणार आहे. 


मूलांक 7


मार्चचा पहिला आठवडा 7 क्रमांकाच्या लोकांसाठी गोड आणि आंबट अनुभव घेऊन येणार आहे. आर्थिक बाबींमध्ये तुम्हाला थोडे निर्बंध वाटणार आहे. मात्र जर तुम्ही जोखीम घेऊन गुंतवणुकीचा निर्णय घेतला तर तुम्हाला चांगले परिणाम मिळणार आहे. कामाच्या ठिकाणी अहंकाराचे भांडण टाळल्यास चांगले परिणाम मिळणार आहेत. लव्ह लाईफचे प्रश्न संवादातून सोडवले तर बरे होणार आहे. सप्ताहाच्या शेवटी व्यावहारिक निर्णय घेतल्यास सुख-समृद्धीची नांदणार आहे. 


मूलांक 8


मार्चच्या पहिल्या आठवड्यात 8 क्रमांकाच्या लोकांना धार्मिक कार्यात रस असणार आहे. कुटुंबात काही धार्मिक कार्यक्रमही होणार आहे. आर्थिक बाबींवर संयम ठेवण्याची गरज आहे अन्यथा खर्च वाढणार आहे. तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्हाला हवे असलेले बदल साध्य करण्यासाठी जास्त वेळ लागणार आहे. काही कारणांमुळे तुमच्या प्रोजेक्टमध्ये समस्या वाढणार आहे. आठवड्याच्या शेवटी, बहुआयामी दृष्टिकोन तुमच्यासाठी चांगली बातमी मिळणार आहे. 


मूलांक 9 


9 क्रमांकाच्या लोकांचा आत्मविश्वास वाढणार आहे. ते त्यांच्या कामातील आव्हानांवर मात करण्यास सक्षम असणार आहे. आर्थिक प्रगतीच्या अनेक संधी या आठवड्यात उपलब्ध होणार आहेत. या आठवड्यात आर्थिक लाभही मिळणार आहे.  तुम्ही तुमच्या गुंतवणुकीत खूप व्यस्त असणार आहात. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल आणि मित्र-परिवारासह सहलीला जाण्याची योजना आखणार आहात. तुमच्या तसंच तुमच्या कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे. अन्यथा तुम्हाला विनाकारण धावपळ करावी लागेल. सप्ताहाच्या शेवटी परस्पर प्रेम अधिक दृढ होणार आहे, त्यामुळे मन प्रसन्न राहणार आहे.


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती अंक शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)