Weekly Tarot Horoscope Prediction 15 to 21 July 2024 in Marathi : जुलैच्या तिसऱ्या आठवड्यात बुधादित्य राजयोग जोरदार प्रभावशाली दिसून येणार आहे. या आठवड्यात सूर्य आणि बुध एकत्र कर्क राशीत असल्यामुळे बुधादित्य राजयोगाची निर्माण होणार आहे.  गुंतवणूक, करिअरमध्ये प्रगती आणि कुटुंबात आनंद आणणारा आहे हा राजयोग मेष ते मीन राशीच्या सर्व राशीच्या लोकांसाठी कसा असेल जाणून घ्या टॅरो कार्ड रीडर डॉ. कविता ओझा यांच्याकडून (weekly tarot horoscope prediction tarot card reading for 15 to 21 July 2024 saptahik rashi bhavishya in marathi)


मेष (Aries Zodiac)  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टॅरो कार्ड्सनुसार या राशीच्या लोकांना असं वाटणार आहे की त्यांचं काम या आठवड्यात उशिरा पूर्ण होणार आहे. आपण बदलू शकत नाही अशा काही गोष्टींशी तडजोड करावी लागणार आहे. सरकार आणि प्रशासनाकडून तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागणार आहे. 


वृषभ (Taurus Zodiac) 


टॅरो कार्ड्सनुसार, या राशीचे लोक या आठवड्यात पैसे गुंतवू करु शकणार आहेत. ही गुंतवणूक तुमच्यासाठी फायदेशीर सिद्ध होणार आहे. प्रियजनांच्या संपर्कात राहणे तुम्हाला फायदेशीर ठरेल. तुमच्यासाठी हा एक लाभदायक आठवडा सिद्ध होणार आहे. जिथे चांगल्या संधी तुमची वाट पाहत आहेत. नोकरीच्या ठिकाणी काही विशेष लाभ किंवा नवीन संधी मिळणार आहे. 


मिथुन (Gemini Zodiac)


टॅरो कार्ड्सनुसार या राशीचे लोक या आठवड्यात सर्जनशील क्षेत्रात विशेष चमकणार आहात. तसंच, या आठवड्यात तुम्हाला खूप आराम मिळणार आहे. तुमच्या कार्यक्षेत्रातील प्रगतीबद्दल तुम्ही समाधानी असणार आहात. आरोग्याची पूर्ण काळजी घ्या. 


कर्क (Cancer Zodiac)   


टॅरो कार्ड्सनुसार या राशीच्या लोकांना या आठवड्यात प्रत्येक स्तरावर समायोजन करणे आवश्यक असणार आहे. तसंच सर्व कामात संयमाने करावे लागणार आहे. या आठवड्यात इतरांच्या बाबतीत जास्त हस्तक्षेप करू नका. तुम्हाला तुमच्या आरोग्याबाबत जागरूक राहा.


सिंह (Leo Zodiac) 


टॅरो कार्डनुसार या राशीच्या लोकांना या आठवड्यात आर्थिक बाबतीत थोडे सावध राहावे लागणार आहे. तुमचा पैसा हुशारीने वापरणे हिताचे ठरेल. तुमच्या करिअरमध्ये प्रगती होणार आहे. अविवाहितांना लग्नाच्या नवीन प्रस्ताव येणार आहे. विद्यार्थ्यांसाठी काळ अनुकूल असणार आहे. त्यांची कामगिरीही चांगली होणार आहे.


कन्या (Virgo Zodiac)    


टॅरो कार्डनुसार या राशीच्या लोकांच्या कुटुंबात बदल होणार आहे. तसंच या आठवड्यात मालमत्तेच्या माध्यमातून लाभ होणार आहे. तुम्ही आधीच तुटलेल्या नात्यांमुळे तुम्हाला मानसिक त्रास होण्याची शक्यता आहे. तुमच्या मुलांकडून तुम्हाला चांगली बातमी कानावर पडणार आहे.


तूळ (Libra Zodiac)  


टॅरो कार्ड्सनुसार जुलैचा हा आठवडा या राशीच्या लोकांसाठी फारसा अनुकूल नसणार आहे. म्हणून स्वत: ला मर्यादित ठेवा, जास्त पसरू नका आणि कोणतीही समस्या ओढवून घेऊ नका. तुमचे सहकारी आणि मित्रांसोबत सौहार्दपूर्ण संबंध ठेवल्यास चांगले परिणाम मिळतील. हा आठवडा तुमच्या आरोग्यासाठी चांगला नसणार आहे. 


वृश्चिक (Scorpio Zodiac)   


टॅरो कार्ड्सनुसार जुलैचा तिसरा आठवडा खूप चांगला असणार आहे. तुम्ही तुमच्या समस्या मित्रांसोबत शेअर केल्यास तुम्हाला आराम मिळणार आहे. त्याच वेळी, या राशीच्या विद्यार्थ्यांना यश मिळणार आहे. तुमच्या दैनंदिन कामात अडथळे आल्याने तुम्हाला आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागणार आहे. वैवाहिक जीवनातही थोडी अस्वस्थता असणार आहे. 


धनु (Sagittarius Zodiac) 


टॅरो कार्ड्सनुसार या राशीचे लोक या काळात विरुद्ध लिंगाच्या सहकाऱ्याकडून आकर्षित होणार आहे. भूतकाळ विसरून वर्तमानात जगण्याचा प्रयत्न करा ते तुमच्यासाठी हिताच ठरेल. नोकरीच्या ठिकाणी नवीन संधींमध्ये यश मिळणार आहे. प्रेमसंबंधांमध्येही तणाव निर्माण होणार आहे. पण, तुम्हाला हुशारीने वागावे लागणार आहे.


मकर (Capricorn Zodiac)  


टॅरो कार्ड्सनुसार या राशीच्या लोकांना या आठवड्यात तुमच्या मागील प्रयत्नांचे फायदे मिळणार आहे. कामासाठी वेळ समाधानकारक असणार आहे. मात्र मैत्रीमध्ये काही अडचणी येऊ येण्याची शक्यता आहे. प्रवासासाठी वेळ अनुकूल असणार आहे. एकंदरीत हा सकारात्मक काळ असणार आहे. 


कुंभ (Aquarius Zodiac)   


टॅरो कार्ड्सनुसार या राशीच्या लोकांना अज्ञात स्त्रोताकडून अनपेक्षित बातमी मिळेल जी आनंददायी असणार आहे. तसंच, नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी हा आठवडा शुभ असणार आहे. वैवाहिक किंवा प्रेमसंबंधांसाठी वेळ संमिश्र असणार आहे. वेळेचा सदुपयोग करण्यात विद्यार्थी यशस्वी होणार आहे. 


मीन  (Pisces Zodiac)


टॅरो कार्ड्सनुसार या राशीच्या लोकांनी या काळात विशेषतः सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. प्रवासापूर्वी फक्त देवाचे नाव घेत राहा. धोकादायक कृती करू नका. तुमच्या कार्यक्षेत्रात येणारे अडथळे दूर होणार आहे. परिणाम तुमच्यासाठी अनुकूल असणार आहे. 


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती टॅरो कार्डवर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)