Weekly Tarot Horoscope : बुध-शुक्र युतीमुळे राजयोग! हा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? जाणून घ्या टॅरो कार्ड साप्ताहिक राशीभविष्य
Weekly Tarot Horoscope Prediction 8 to 14 april 2024 in Marathi : एप्रिल महिन्याचा हा दुसरा आठवडा अतिशय खास आहे. या आठवड्याची सुरुवात सोमवती अमावस्या, सूर्यग्रहणाने तर दुसरा दिवशी हिंदू नवीन वर्ष म्हणजे गुढीपाडव्याने होणार आहे. त्याशिवाय अतिशय शुभ असा लक्ष्मी नारायण राजयोगही आहे. कसा असेल हा आठवडा तुमच्यासाठी जाणून घ्या.
Weekly Tarot Horoscope Prediction 8 to 14 april 2024 in Marathi : एप्रिल महिन्याचा दुसरा आठवड्याची सुरुवात सोमवती अमावस्येने होणार आहे. सोमवती अमावस्येला या वर्षातील पहिलं सूर्यग्रहण आहे. त्यानंतर मंगळवारी 9 एप्रिलला हिंदू नवं वर्ष तर मराठी लोकांचं गुढीपाडवा आहे. ग्रहण गोचरनुसार बुध मीन राशीत तर सूर्य मेष राशीत असणार आहे. यामुळे या आठवड्यात चैत्र महिन्यात लक्ष्मी नारायण योग आणि धन योग आहे. अशात हा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या टॅरो कार्ड रीडर डॉ. कविता ओझा यांच्याकडून (weekly tarot horoscope prediction tarot card reading for 8 to 14 april 2024 saptahik rashi bhavishya in marathi)
मेष (Aries Zodiac)
या राशीच्या लोकांसाठी एप्रिलचा दुसरा आठवडा खूप सकारात्मक असणार आहे. या लोकांनी आयुष्यात व्यावहारिक राहल्यास त्यांना फायदा होईल. या आठवड्यात तुम्हाला आर्थिक लाभ होणार आहे. तर आरोग्यातही सुधारणा होणार आहे. मात्र कामात गती मिळणार नाही. आयुष्यात काही गोष्टींची कदर करणे हेच तुमच्यासाठी शहाणपणाचं ठरेल.
वृषभ (Taurus Zodiac)
या राशींनी या आठवड्यात कुटुंबातील सदस्यांसोबत कोणत्याही गंभीर विषयावर चुकूनही चर्चा करु नका. कारण अशामुळे घरातील वातावरण खराब होईल. तर कामाच्या ठिकाणी तुम्हाला मनासारखं वातावरण लाभणार नाही. पण आठवड्याच्या शेवटी शेवटी वातावरण सुधारेल.
मिथुन (Gemini Zodiac)
हा आठवडा मिथुन राशीसाठी जरा एकटेपणा आणि उदास वाटणार आहे. शुभचिंतकांकडून टीका तर विरोधकांच्या संख्येत वाढ होणार आहे. या आठवड्यात तुमच्या वाणीवर नियंत्रण ठेवा. करार करताना संयम ठेवा.
कर्क (Cancer Zodiac)
कर्क राशीच्या लोकांचे विचार या आठवड्यात इतरांशी जुळणार नाही. ज्यामुळे लोकांमध्ये तुमच्याबद्दल गैरसमज तयार होईल. यामुळे तुमचा संताप वाढणार आहे. त्यापेक्षा तुमच्या समस्यांवर लक्ष केंद्रित करा नाहीत तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं.
सिंह (Leo Zodiac)
सिंह राशीसाठी चैत्र महिन्याचा पहिला आठवडा अतिशय शुभ असणार आहे. तुम्हाला अनपेक्षित फायदा होणार आहे. तुम्ही गुंतवणूक करु शकता. जोडीदाराकडून तुम्हाला या आठवड्यात सहकार्य लाभणार आहे. कुटुंबात आनंद आणि समृद्धी नांदणार आहे.
कन्या (Virgo Zodiac)
या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा कार्यक्षेत्रात प्रगतीचा असणार आहे. कुटुंब आणि मित्रांसोबत आनंदायी क्षण व्यतित करणार आहे. तुमच्यामध्ये नवीन ऊर्जा आणि उत्साह या आठवड्यात संचार करणार आहे. सर्व कामं वेळेत पूर्ण करण्यात तुम्ही यशस्वी होणार आहात.
तूळ (Libra Zodiac)
या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा खूप फायदेशीर आहे. या आठवड्यात तुमच्या स्वभावात आक्रमकता असणार आहे. अनावश्यक खर्च टाळा. नाही तर आर्थिक स्थिती बिघडेल. जोडीदार किंवा व्यवसायातील भागीदारासोबत तुमचे वाद होण्याची शक्यता आहे.
वृश्चिक (Scorpio Zodiac)
या आठवड्यात तुम्ही विरुद्ध लिंगाच्या सहकारीकडे आकर्षित होणार आहात. करिअरमध्ये तुम्हाला नवीन संधी मिळणार आहे. मात्र या आठवड्यात आरोग्याकडे दुर्लक्ष करु नका. आरोग्याची समस्या गंभीर वळण घेऊ शकते.
धनु (Sagittarius Zodiac)
या राशीच्या लोकांना हा आठवडा कठीण असणार आहे. या लोकांनी जनसंपर्काकडे लक्ष केंद्रीत करा. एखाद्या गोष्टीमुळे तुमचं मन दुखणार आहे. विरोधांचा सामना तुम्हाला करावा लागणार आहे. वाणीवर नियंत्रण ठेवा आणि संयम बाळगा.
मकर (Capricorn Zodiac)
ही लोक या आठवड्यात कामात बिझी राहणार आहे. तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा सुधारणार आहे. कामाच्या ठिकाणी प्रगती पाहून तुम्ही आनंदी असणार आहात. कुटुंबासोबत आनंदी वेळ व्यतित करणार आहात.
कुंभ (Aquarius Zodiac)
या लोकांसाठी गुढीपाडव्याचा हा आठवड्यात शुभ असणार आहे. तुम्हाला कार्यक्षेत्रात इतका दिवसापासून वाट पाहत असलेली संधी मिळणार आहे. कुटुंबात आनंद असणार आहे. अनपेक्षित लाभ होणार आहे. जोडीदारासोबत तुमचं संबंध चांगले होणार आहे.
मीन (Pisces Zodiac)
या राशीच्या लोकांना कामाच्या ठिकाणी चांगली संधी मिळणार आहे. पण विचारपूर्वक निर्णय घ्या कारण तुमचा स्वभाव आक्रमक असणार आहे. तुम्हाला नैराश्य येऊ शकतं. शिवाय या आठवड्यात उगाचच खर्च करु नका. एवढंच नाही तर जोडीदारासोबत वाद होऊ शकतो.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)