Weekly Tarot Horoscope Prediction 8 to 14 July 2024 in Marathi : टॅरो कार्ड्सच्या गणितानुसार धन लक्ष्मी राजयोग जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात अनेक राशींवर परिणाम करणार आहे. चला तर मग हा आठवडा मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी कसा असेल जाणून घ्या टॅरो कार्ड रीडर डॉ. कविता ओझा यांच्याकडून (weekly tarot horoscope prediction tarot card reading for 8 to 14 July 2024 saptahik rashi bhavishya in marathi)


मेष (Aries Zodiac)  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा खूप चांगला असणार आहे. या आठवडय़ात चांगल्या कामाच्या वर्तनामुळे प्रगतीच्या संधी तुम्हाला लाभणार आहेत. तर या आठवड्यात विद्यार्थ्यांना स्पर्धांमध्ये यश मिळणार आहे. तर काही लोकांची साहित्य आणि संगीताची आवड वाढणार आहे. मालमत्ता, घर आणि कौटुंबिक बाबतीत तुम्ही नवीन सुरुवात करणार आहात. मात्र प्रलंबित कामं पूर्ण होण्यास आणखी काही कालावधी लागण्याची शक्यता आहे. 


वृषभ (Taurus Zodiac) 


टॅरो कार्ड्सनुसार या राशीच्या लोकांसाठी जुलैचा दुसरा आठवडा फारसा अनुकूल नसणार आहे. त्यामुळे स्वत:ला मर्यादित ठेवून कार्यक्षेत्रात विनाकारण वाढ करु नका. सहकारी आणि मित्रांसोबत सौहार्दपूर्ण संबंध ठेवण्याचा प्रयत्न केल्यास चांगले परिणाम मिळतील. हा आठवडा तुमच्या आरोग्यासाठी चांगला नसणार आहे. जागा बदलण्याची शक्यताही कार्ड्स दर्शवतेय. 


मिथुन (Gemini Zodiac)


टॅरो कार्डनुसार या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा खर्चिक असणार आहे. यामुळे तुम्ही कोणत्याही कामावर पूर्ण लक्ष केंद्रित करू शकणार नाही. वैवाहिक नात्यातही चढ-उतार पाहिला मिळणार आहे. तसंच, या राशीच्या विद्यार्थ्यांना आवश्यकतेपेक्षा जास्त मेहनत करावी लागणार आहे. या आठवड्यात नाती, विरोध आणि संधी एकाच वेळी तुमच्यासमोर येणार आहे. 


कर्क (Cancer Zodiac)   


या राशीच्या लोकांनी या आठवड्यात आपल्या प्रतिष्ठेचा भंग होणार नाही याची काळजी घ्यावी लागणार आहे. उपजीविकेच्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांनी सहकाऱ्यांशी समन्वय राखणे हिताच ठरेल. तर काही कारणांमुळे रविवारी तुम्हाला निराश वाटू शकतं. या आठवड्यात तुमचे अनुभव तुम्हाला अनेक नवीन माहिती देणार आहेत.


सिंह (Leo Zodiac) 


या राशीच्या लोकांनी या आठवड्यात त्यांच्या आरोग्याबाबत सावधगिरी बाळगणे आवश्यक असणार आहे. या आठवड्यात तुमचे आरोग्य तुमच्यासाठी समस्या निर्माण करणार आहे. तर कुटुंबातील सदस्यांच्या सहकार्याने जीवनात आनंद असणार आहे. पैशाचा अपव्यय टाळणे हिताच ठरेल अन्यथा तुम्ही अडचणीत येऊ शकता. तुमच्या जोडीदाराच्या भावनांचा आदर करा. 


कन्या (Virgo Zodiac)   


या राशीच्या लोकांचा प्रभाव, करिष्मा आणि सर्जनशील प्रवृत्ती त्यांना शिखरावर नेणार आहे. विद्यार्थ्यांसाठी वेळ उपयुक्त ठरणार आहे. त्याची आवड अभ्यास आणि लेखनात असणार आहे. या आठवड्यात तुमचे प्रेमसंबंध अधिक घट्ट होणार आहे. व्यावसायिकांसाठीही हा काळ प्रगतीचा असणार आहे. या आठवड्यात तुम्हाला लाभाच्या अनेक चांगल्या संधी मिळणार आहेत. विजयाच्या मार्गावर तुम्ही पुढे वाटचाल करणार आहात. 


तूळ (Libra Zodiac)  


या आठवड्यात भागीदारीमध्ये केलेले कार्य या राशीच्या लोकांसाठी अनुकूल ठरणार आहे. नोकरदार लोकांच्या जीवनात प्रगतीचे नवीन मार्ग खुले होणार आहेत. तुम्ही सध्या जे करत आहात ते कनेक्शन भविष्यात फायद्याचे ठरणार आहे. तुमच्या जोडीदाराच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागणार आहे. 


वृश्चिक (Scorpio Zodiac)   


या राशीच्या लोकांना हा आठवडा त्यांच्या सुरक्षिततेबद्दल थोडे सावध राहावे लागणार आहे. तुम्ही कुठे जात असाल तर सहलीला जाण्यापूर्वी तुमच्या घराच्या सुरक्षिततेसाठी पुरेशी व्यवस्था करावी लागणार आहे. तुमच्या कुटुंबातील कोणाशी तरी तुमच्या लग्नाची चर्चा होऊ शकते. तर प्रेम प्रकरणात अती घाई नको. आर्थिक स्थिती समाधानकारक असणार आहे. 


धनु (Sagittarius Zodiac) 


या राशीचे लोक व्यावहारिक आणि प्रतिष्ठित लक्ष्यांवर अधिक लक्ष केंद्रित करणार आहेत. तुम्ही खूप भावनिक होऊ नका. या आठवड्यात लोकांसमोर तुमच्या भावना जास्त व्यक्त करू नका. या आठवड्यात रविवार घर, कौटुंबिक सुरक्षितता आणि काळजीत जाणार आहे. 


मकर (Capricorn Zodiac)   


या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा सौम्य आणि ज्ञानाने भरलेला असणार आहे. तुम्हाला व्यवसायात नवीन यश आणि प्रगती लाभणार आहे. तसंच तुमची सर्व प्रलंबित कामं पूर्ण होणार आहे. या आठवड्यात तुमच्या जुन्या सवयी सोडण्याचा प्रयत्न करा. कामावरील उच्च अधिकारी तुमची पात्रता तपासण्यासाठी तुमच्यावर कामाचा ताण वाढण्याची शक्यता आहे. 


कुंभ (Aquarius Zodiac) 


या राशीच्या लोकांसाठी जुलैचा दुसरा आठवडा आर्थिक बाबतीत अनुकूल असणार आहे. या आठवड्यात तुमची आर्थिक बाजू मजबूत होणार आहे. नवीन खरेदीसाठीही हा आठवडा अनुकूल आहे. या आठवड्यात तुम्ही नवीन फायदेशीर नातेसंबंध निर्माण करणार आहात. तुम्ही अतिशय आरामात काम करणार आहात. 


मीन  (Pisces Zodiac)  


या आठवड्यात या राशीच्या लोकांचे वर्तन अतिशय आक्रमक असणार आहे. याशिवाय तुमचं वैवाहिक जीवनही काहीसे आंबट आणि गोड अनुभव देणार असणार आहे. मात्र या राशीच्या विद्यार्थ्यांना या आठवड्यात अधिक मेहनत करावी लागणार आहे. गुरुवारी, नातेसंबंध, संधी आणि विरोध एकाच वेळी तुमच्या आयुष्यात प्रवेश करणार आहे. 


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती टॅरो कार्डवर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)