Baba Vanga Prediction : गेल्या काही वर्षांमध्ये जगभरात भविष्य जाणून घ्यायचं आणि वाचण्याचा ट्रेंड वाढलाय. यातील प्रसिद्ध बल्गेरियाच्या बाबा वेंगा यांचं भाकीत जगभरात खूप चर्चेली जाते. पाश्चात्या देशांमधील मीडिया रिपोर्ट्सनुसार बाबा वेगा एक फकीर होत्या आणि त्यांची भविष्यवाणी जवळपास खरी निघाली आहे. बाबा वेंगा यांनी आतापर्यंत विनाश, युद्ध, राजकीय अस्थिरता, आर्थिक संकट, महामारी या अनेक घटनांवर भविष्यवाणी केलंय. त्यांनी 2024 मधील हवामानाबद्दलही भाकीत केलंय. 


हवामानाशी संबंधित बाबा वेंगांची भविष्यवाणी काय होती?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बाबा वेंगा हिने यावर्षी ग्लोबल वॉर्मिंगशी संबंधित भाकीत केलंय. यावर्षी संपूर्ण जगाला हवामानाशी संंबंधित अनेक गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे. एवढंच नाही तर नैसर्गिक आपत्ती येण्याच भाकीत बाबा वेंगा यांनी केलंय. त्यांच्या भविष्यवाणीनुसार ही ग्लोबल वॉर्मिंगमुळे जे जगाला विनाशाकडे घेऊ जाणार आहे. एका अभ्यासानुसार, यावर्षी उष्णतेच्या लाटेत सर्वाधिक तापमान 40 वर्षांपूर्वी नोंदविलेल्या तापामानापेक्षा खूपच जास्त असणार आहे. 


जागतिक हवामान संघटनेने देखील 2024 हे विक्रमी उष्ण वर्ष म्हणून सांगितलं होतं. त्यात आता बाबा वेंगा यांची भविष्यवाणी जवळपास सत्य होईल असा दावा काही लोकांकडून करण्यात येतो. गेल्या वर्षीच्या तुलनेत 2024 मध्ये उन्हाळ्याचा प्रवाह अधिक असून प्रचंड उष्णतेच्या लाटांमुळे जनजीवन विस्कळीत होणार आहे असं सांगण्यात आलंय. शिवाय यंदा दुष्काळ आणि जंगलांना आग लागण्याच्या घटनांमध्येही वाढ होऊ शकते असंही भाकीत बाबा वेंगा यांनी केलंय. 


आर्थिक संकट कोसळणार?


बाबा वेंगा यांनी 2024 साठी आर्थिक घडामोडीवरही भाकीत केलंय. या वर्षी जागतिक आर्थिक शक्तीतील बदलासोबत  भू-राजकीय तणाव आणि कर्जाची वाढती पातळी पाहिला मिळणार आहे. यामुळे संपूर्ण जगावर मोठं आर्थिक संकट कोसळण्याची शक्यताही त्यांनी वर्तविलीय. जगातील मोठे आणि बलाढ्य देशही आर्थिक मंदीचा सामना करताना दिसत आहे. 


कर्करोगावर लस येणार?


बाबा वेंगा यांचं एक भाकीत असं आहे की कर्करोग आणि अल्झायमरसारख्या अनेक असाध्य आजारांवर उपचार शोधण्यात तज्ज्ञांना यश मिळणार आहे. अनेक शास्त्रज्ञांनी कर्करोगावर लस शोधण्याचा दावा केल्या असताना बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणीनुसार 2024 हे वर्ष वैद्यकीय प्रगतीचं सिद्ध होणार आहे. 


(Disclaimer -  वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)