Amalaki Ekadashi 2024 : आमलकी एकादशी कधी आहे? या दिवशी आवळा वृक्षासह होळीशी आहे संबंध
Amalaki Ekadashi 2024 : प्रत्येक महिन्यात दोन एकादशी येत असतात. फाल्गुन महिन्यातील एकादशी अतिशय खास असून त्यादिवशी आवळा वृक्षाची पूजा करण्यात येते. या एकादशीला आमलकी आणि रंगभरी एकादशी असं संबोधलं जातं.
Amalaki Ekadashi 2024 : हिंदू धर्मात प्रत्येक सण उत्सव आणि व्रताला विशेष महत्त्व आहे. हे सण उत्सव आणि व्रत कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित असतात. प्रत्येक महिन्यात दोन एकादशी येत असतात एक शुक्ल पक्ष आणि दुसरी कृष्ण पक्षातील येते. ही एकादशी भगवान विष्णूला समर्पित असून फाल्गुन महिन्यातील एकादशीला आवळा झाडी पूजा करण्यात येते. या एकादशीला आमलकी एकादशी असं म्हणतात. तर काशीमध्ये याच एकादशीला रंगभरी एकादशी असं म्हणतात. (When is Amalaki Ekadashi 2024 This day is associated with Holi with amla tree puja vidhi and shubh muhurt)
पौराणिक कथेनुसार आमलकी किंवा रंगभरी एकादशीच्या तिथीला भगवान शंकर आणि माता पार्वती यांचा विवाह झाल्यानंतर ते काशीमध्ये आले होते. त्यामुळे यादिवशी भोलेनाथाचे भक्त रंग, अबीर आणि गुलालांची उधळण करण्यात येते. यादिवसापासून वाराणसीमध्ये होळी सणाला सुरुवात होते आणि पुढील 6 दिवस रंगांचा सण साजरा करण्यात येतो.
आमलकी किंवा रंगभरी एकादशी तिथी कधी? (Amalaki Ekadashi 2024 Shubh Muhurat)
पंचांगानुसार फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथी 20 मार्चला दुपारी 12:12 वाजेपासून सुरु होणार आहे. तर दुसऱ्या 21 मार्चला पहाटे 2:22 वाजेपर्यंत आहे. अशा स्थितीत उदय तिथीनुसार बुधवार 20 मार्चला एकादशीचं व्रत करण्यात येणार आहे.
रंगभरी एकादशीच्या पूजेचा शुभ मुहूर्त - 20 मार्चला सकाळी 6.25 वाजेपासून सकाळी 9.27 वाजेपर्यंत
आमलकी एकादशी किंवा रंगभरी एकादशीचं व्रत या दिवशी सोडा
एकादशीचं व्रत हे गुरुवार 21 मार्चला दुपारी 1:41 वाजेपासून ते 4:07 वाजेपर्यंत तुम्ही उपवास सोडू शकता.
आमलकी एकादशी पूजा पद्धत समजून घ्या
आमलकी एकादशीला सकाळी लवकर उठून आंघोळीनंतर स्वच्छ वस्त्र धारण करा. आता घरातील मंदिराची स्वच्छता करुन भगवान विष्णूची आराधना करा. हातात पाणी घेऊन व्रताचं संकल्प घ्या. भगवान विष्णूच्या मूर्ती किंवा फोटोचं पूजन करा. आता विष्णू सहस्त्रनाम पाठ वाचा. विष्णूला आवळा अर्पण करायला विसरु नका.
आमलकी एकादशीला आवळा वृक्षाला महत्त्व का?
आमलकी एकादशीला आवळ्याच्या झाडाचीही पूजा करण्याची परंपरा आहे. आवळ्याच्या झाडाची पूजा करताना रोळी, चंदन, फुलं आणि अक्षत अर्पण केलं जातं. धर्मशास्त्रात असं सांगण्यात आलंय की, आमलकी एकादशीला आवळ्याच्या झाडांची पूजा केल्यास भक्तांची सर्व दु:ख दूर होतात आणि घरात सुख समृद्धी वाढतं अशी मान्यता आहे.
धार्मिक शास्त्रानुसार आवळा वृक्षात भगवान विष्णूंचा वास असतो असं म्हणतात. आवळा झाडाला सत्तावीस किंवा नऊ वेळा प्रदक्षिणा माराव्यात, असं धर्मशास्त्रात सांगण्यात आलंय.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)