Kalashtami 2022: कालाष्टमीला हे उपाय करून मिळवा कालभैरवाची कृपा, जाणून घ्या पूजा विधी आणि मुहूर्त
Kalashtami 2022: कालभैरव हे भगवान शंकराचा रौद्र अवतार आहे. कालभैरवाला प्रसन्न असले की, जीवनात कोणत्याही अडचणी किंवा दु:ख येत नाही. त्याचबरोबर भगवान शंकराचीही कृपा असते. प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमीला कालाष्टमी असं संबोधलं जातं. ही अष्टमी कालभैरवाला समर्पित आहे.
Kalashtami 2022: कालभैरव हे भगवान शंकराचा रौद्र अवतार आहे. कालभैरवाला प्रसन्न असले की, जीवनात कोणत्याही अडचणी किंवा दु:ख येत नाही. त्याचबरोबर भगवान शंकराचीही कृपा असते. प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमीला कालाष्टमी असं संबोधलं जातं. ही अष्टमी कालभैरवाला समर्पित आहे. या दिवशी देवी दुर्गेचीही पूजा केली जाते. मार्गशीर्ष महिन्यातील कालाष्टमी 16 डिसेंबर 2022 रोजी शुक्रवारी साजरी केली जाईल. या दिवशी कालभैरव पूजा आणि काही नियमांचं पालन केल्यास लाभ मिळतो.
कालाष्टमी शुभ मुहूर्त
हिंदू पंचांगानुसार मार्गशीर्ष महिन्यातील कालाष्टमी म्हणजेच कृष्ण पक्षातील अष्टमी 16 डिसेंबर 2022 मध्यराथ्री 1 वाजून 39 मिनिटांनी सुरु होईल. 17 डिसेंबर सकाळी 3 वाजून 2 मिनिटांनी समापन होईल. उदय तिथीनुसार कालाष्टमी 16 डिसेंबर 2022 रोजी साजरी केली जाईल.
बातमी वाचा- Vastu Tips: ही तुळस चुकूनही घरात लावू नका, अन्यथा नुकसान झालंच समजा
कालाष्टमीला काय करावं काय नाही
कालाष्टमीला कालभैरवाची मोठ्या भक्तिभावाने पूजा करावी. या दिवशी कालभैरवाची कथा जरूर ऐकावी. तसेच कालभैरवाच्या 'ओम कालभैरवाय नम:' या मंत्राचा जाप करावा
कालाष्टमीला गरीबांना भोजन आणि कपड्यांचं दान करावं. कालभैरवाच्या मंदिरात जाऊन तेलाचा दिवा लावावा.
कालाष्टमीला कुत्र्यांना भोजन द्यावं. तसेच या दिवशी कोणाशीही खोटं बोलू नये. कोणाचीही फसवणूक करू नये. अन्यथा त्याचा फटका आपल्या बसू शकतो.
कालभैरवाची पूजा केल्यानंतर भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजाही जरूर करावी.
गृहस्थ लोकांना भगवान कालभैरवाची तामसिक पूजा करू नये.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य समजुती आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)