Kanya Pujan Navratri 2024 : शारदीय नवरात्रीला सुरुवात झाली असून दुर्गा देवीच्या नऊ रुपांची पूजा आणि उपासना करण्यात येतं आहे. त्यासोबत नवरात्रीमध्ये कन्या पूजेला विशेष महत्त्व आहे. अष्टमी आणि नवमी तिथीला कन्यापूजा करण्यात येते. लहान मुलींचे पाय धुवून त्यांची पूजा करुन त्यांना पुरी, हलवाचे जेवण आणि सोबत काही तरी भेटवस्तू देण्यात येते. यंदा 10 की 11 ऑक्टोबर कधी आहे कन्यापूजन जाणून योग्य तिथी, शुभ मुहूर्त आणि महत्त्व...


कधी आहे कन्यापूजा?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यंदा महाअष्टमी आणि नवमी तिथी एकाच दिवशी आली आहे. पंचांगानुसार, यावर्षी अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील अष्टमी तिथी 10 ऑक्टोबरला दुपारी 12:31 वाजेपासून11 ऑक्टोबरला रात्री 12:06 वाजेपर्यंत असणार आहे. उदय तिथीनुसार, शुक्रवारी, 11 ऑक्टोबरला दुर्गा अष्टमी साजरी होणार आहे. त्याच दिवशी कन्यापूजन करण्यात येणार आहे. 


कन्या पूजेला शुभ योग!


कन्या पूजेच्या दिवशी 3 शुभ योग तयार होत आहेत. यावेळी सुकर्म योग, रवियोग आणि सर्वार्थ सिद्धी योग तयार होत आहेत.


कन्या पूजा 2024 शुभ मुहूर्त


कन्या पूजेच्या दिवशी ब्रह्म मुहूर्त पहाटे 04:41 ते 05:30 पर्यंत असतो. या दिवशी सकाळी माँ महागौरी आणि माँ सिद्धिदात्रीची पूजा करा आणि पूजेसाठी मुलींना आमंत्रित करा. दिवसभर सुकर्म योग आहे. मात्र सकाळी 06:20 ते 10:41 ही वेळ पूजेसाठी शुभ आहे. राहुकाल सकाळी 10:41 ते दुपारी 12:08 दरम्यान आहे. 


अशी करा कन्या पूजा!


आमंत्रित मुलींना एका रांगेत बसवा.
घरात मुली आल्यावर सर्व प्रथम त्यांचं पाय स्वच्छ पाण्याने धुवावेत. 
आता त्यांना हरभरा, पुरी, हलवा, खीर इत्यादींचा नैवेद्य अर्पण करा.
मुलींनी जेवण संपवल्यानंतर त्यांना हात धुवून पुन्हा आसनावर बसायला लावा.
यानंतर त्यांना चंदनाचा किंवा कुंकवाचा टिळा लावा आणि रक्षासूत्र बांधून त्यांच्या पायाला स्पर्श करुन नमस्कार करा. 
त्यांना क्षमतेनुसार फळं, वस्त्रं आणि दक्षिणा द्या.


कन्या पूजेमध्ये वयाचे विशेष महत्त्व


दोन वर्षाची कुमारिका म्हणून ओळखली जाते. हिचं पूजन केल्याने दारिद्र्य दूर होतं.
तीन वर्षाची कन्या त्रिमूर्ती रूपात असते. हिचे पूजन केल्याने सुख-समृद्धी नांदते.
चार वर्षाची कन्या कल्याणी असते. हिचे पूजन केल्याने घरात कल्याण होतं.
पाच वर्षाची कन्या रोहिणी रूपात असते. जी रोगमुक्त ठेवते.
सहा वर्षाची कन्या कालिका रूपात असते. हिचे पूजन केल्याने राजयोग प्राप्ती होते.
सात वर्षाची कन्या चंडिका या रूपात असते. ही ऐश्वर्य प्रदान करते.
आठ वर्षाची कन्या शांभवी रूपात असते. हिची पूजा केल्यास विजय प्राप्त होते.
नऊ वर्षाची कन्या दुर्गा देवीचा रूप असते. ही शत्रूंचा नाश करते.
दहा वर्षाची कन्या सुभद्रा रूपात असते. सुभद्रा आपल्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करते.


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)