Ram Navami 2024 : हिंदू धर्मात देवीदेवांची विशेष आराधन करण्यात येते. हिंदू धर्मानुसार चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या नवव्या तिथीला भगवान विष्णू यांनी मानव अवतार घेतला. त्या तिथीला अतिशय महत्त्व आहे. विष्णू यांनी श्रीराम यांचा रुपात अभिजित मुहूर्त आणि कर्क राशीत दुपारी जन्म घेतला. देशभरात रामनवमीचा हा उत्साह मोठ्या थाट्यामाट्या साजरा करण्यात येतो. यंदा अयोध्येत श्रीराम जन्मभूमीत मोठ्या उत्साह असणार आहे. मोठ्या संख्येने भक्त अयोध्येत रामल्लाचे दर्शन घेण्यासाठी रीघ लावणार आहे. अयोध्येचा राजा श्रीरामाची रामनवमी तिथीवरुन भक्तांमध्ये संभ्रम आहे. 16 एप्रिल की 17 एप्रिल नेमकं कधी रामनवमी आहे जाणून घ्या. (When is Ram Navami April 16 or April 17 ram navami 2024 date time shubh muhurat mantra significance in marathi )


राम नवमी 2024 तिथी 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंचांगानुसार, चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील नवमी तिथी मंगळवार 16 एप्रिलला दुपारी 1:23 वाजेपासून दुसऱ्या दिवशी 17 एप्रिलला दुपारी 3:15 वाजेपर्यंत आहे. हिंदू धर्मात उदय तिथीनुसार सण उत्सव साजरे करण्यात येतात. त्यानुसार उदय तिथीनुसार 17 एप्रिल 2024 बुधवारी रामनवमी साजरी करण्यात येणार आहे. 


राम नवमी 2024 शुभ मुहूर्त


रामनवमीला घरोघरी रामाची पूजा करण्यात येणार आहे. त्यासाठी ज्योतिषाचार्य यांनी शुभ मुहूर्त सांगितला आहे. ते म्हणतात रामनवमीच्या दिवशी पूजेसाठी 2 तास 35 मिनिट मिळणार आहे. सकाळी 11:01 ते दुपारी 1:36 पर्यंत तुम्ही श्रीरामाची पूजा करु शकणार आहात. 


विजय मुहूर्त- दुपारी 02:34 ते 03:24 पर्यंत
संध्याकाळ - संध्याकाळी 06:47 ते 07:09 पर्यंत


राम नवमी 2024 शुभ योग


ज्योतिषशास्त्रानुसार रामनवमीच्या दिवशी रवि योग, सर्वार्थ सिद्धी योग आश्लेषा नक्षत्राचा शुभ संयोग असणार आहे. या दिवशी पहाटे 5.16 ते 06.08 या वेळेत सर्वार्थ सिद्धी योग असणार आहे. तर शुभ असा रवि योग दिवसभर असल्याने रामनवमीचा दिवस अतिशय खास असणार आहे. 


राम नवमी 2024 चे महत्त्व


रामचरितमानसच्या बालकांडानुसार, पुत्रप्राप्तीच्या इच्छेमुळे राजा दशरथाच्या आज्ञेवरून वशिष्ठजींनी शृंगी ऋषींना बोलवण्यात आले. वशिष्ठजींनी शुभ पुत्रकामेष्टी यज्ञ केला. या यज्ञानंतर कौसल्या इत्यादी प्रिय राण्यांना एकेक फळ देण्यात आल, ज्यामुळे त्यांना पुत्ररत्न प्राप्त झाली. पुराणानुसार भगवान श्रीरामांचा जन्म त्रेतायुग आणि द्वापर युगातील संधिकालात झाला असं म्हणतात. मात्र आधुनिक संशोधनानुसार भगवान श्रीरामांचा जन्म इ.स.पूर्व 5114 वर्षा पूर्वी झाल्याच बोलं जातं. त्यानुसार श्रीरामाचा जन्म हा आजपासून 7136 वर्षांपूर्वी झाला असं म्हणतात. 


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)