Vijaya Ekadashi 2024 Date : हिंदू धर्मात संकष्टी चतुर्थीनंतर एकादशी व्रताला अतिशय महत्त्व आहे. वर्षभरात 24 एकादशी येत असतात आणि प्रत्येक एकादशी वेगवेगळ्या नावाने ओळखली जाते. भगवान विष्णुला समर्पित एकादशीच व्रत मार्च महिन्यात कधी आहे जाणून घेऊयात. मार्च महिन्यात कृष्ण पक्षाची एकादशी तिथीला विजया एकादशी तर शुक्ल पक्षाची एकादशी तिथीला आमलकी एकादशी असणार आहे. एकादशी तिथीचा दिवस श्री हरि की पूजा केल्याने प्रत्येक क्षेत्रात यश मिळतं असा विश्वास आहे. यंदा विजया एकादशीचं व्रत कधी आहे जाणून घ्या. (When is Vijaya Ekadashi Vijaya Ekadashi 2024 Date Know Tithi Auspicious shubh muhurat puja vidhi and samagri in marathi)


विजय एकादशी 2024 शुभ मुहूर्त


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंचांगानुसार फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षाची एकादशी तिथी ही 06 मार्चची सकाळी 06.30 वाजेपासून 07 मार्चला सकाळी 04.13 वाजेपर्यंत असणार आहे. उदय तिथीनुसार विजया एकादशी व्रत 06 मार्च 2024 ला असणार आहे. हा दिवस भगवान विष्णुची पूजा करण्यासाठी शुभ मुहूर्त सकाळी 06.41 मिनिटांपासून सकाळी 09.37 वाजेपर्यंत असणार आहे. तर विजय एकादशी व्रताचे पारण 07 मार्चला दुपारी 01.44 वाजेपासून संध्याकाळी 04.05 वाजेपर्यंत असणार आहे. 


एकादशी पूजेसाठी साहित्य 


चौरंग किंवा पाट, विष्णूची मूर्ती किंवा फोटो, सुपारी, नारळ, फळं, लौंग, धूप, दिवा, तूप, पंचामृत, अक्षत, तूळस, चंदन, मिठाई, पिवळे वस्त्र, मौली इत्यादी साहित्य पूजेसाठी लागतं. 


एकादशी पूजा विधी


विजया एकादशीच्या दिवशी ब्रह्म मुहूर्तावर उठून आंघोळ करा. घरातील मंदिराची साफसफाई करुन देवांना स्नान घालून स्वच्छ करावं. आता पूजास्थळी चौरंग किंवा पाटावर पिवळ किंवा लाल वस्त्र टाका. आता त्यावर विष्णूची प्रतिमा किंवा मूर्तीची स्थापना करा. त्यानंतर विष्णुच्या प्रतिमेची गंगाजलाने अभिषेक करा. आता पिवळं चंदन, हळदी कुंकू, फुलं आणि तुळशी अर्पण करा. आता विष्णुला नैवेद्य दाखवून आरती करा. 


एकादशी व्रताला संध्याकाळी खाऊ शकता?


एकादशी व्रताच्या दिवशी फळं, साखर, बटाटा, साबूदाणा, नारळ, बदाम दूध, मिरची, सेंध मिठ तुम्ही खाऊ शकता. 


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)