Mrityu Panchak 2024:  ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह तारे च्यांच्या स्थितीनुसार अनेक कामे केली जातात. या स्थितीवरच शुभ आणि अशुभ वेळा ठरत असतात. हिंदू कॅलेंडरमधील प्रत्येक महिन्यातील 5 दिवस अशुभ मानले जातात. हे पाच दिवस पंचक म्हणून ओळखले जातात. पंचक काळाचा अत्यंत वाईट प्रभाव पडतो. नवीन वर्ष 2024 च्या पहिल्या महिन्यात म्हणजे जानेवारी महिन्यातच मृत्यू पंचक असणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शास्त्रानुसार मृत्युपंचक अत्यंत धोकादायक मानले जाते. या काळात कोणतेही शुभ कार्य केले जात नाही. शुभ कार्य केल्यास त्याचे वाईट परिणाम दीर्घकाळ भोगावे लागतात. जानेवारी 2024 मध्ये मृत्यू पंचक कधी सुरु होणार आणि त्याचा प्रभाव कधीपर्यंत आहे तसेच या काळात कोणती कामे निषिद्ध आहेत हे जाणून घेवूया.


मृत्यू पंचक म्हणजे नेमकं काय?


वर्ष 2024 मधील पहिला मृत्यू पंचक शनिवार, 13 जानेवारी 2024 रोजी रात्री 11:35 वाजता सुरू होईल. 18 जानेवारी 2024 रोजी पहाटे 03:33 वाजता याची समाप्ती होईल.  2024 सालातील हे पहिले पंचक असेल.
धनिष्ठा, शतभिषा, पूर्वा भाद्रपद, उत्तरा भाद्रपद आणि रेवती नक्षत्रात चंद्र फिरतात अशा ग्रह स्थितीला पंचक म्हणतात. ही सर्व नक्षत्रे पार करण्यासाठी चंद्राला सुमारे पाच दिवसांचा कालावधी लागतो. दर 27 दिवसांनी पंचक येते.
ज्योतिष शास्त्रानुसार पंचक काळात एखाद्याचा मृत्यू झाल्यास ते अशुभ मानले जाते. पंचक काळात मृत्यू झाल्यास कुटुंबातील पाच लोकांचा मृत्यू होण्याची भिती असते. मृत्युपंचक काळात कोणाचा मृत्यू झाला तर त्याच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याबरोबरच कुशाचे पाच पुतळे बनवून विधीनुसार अंतिम संस्कार करण्याचा नियम आहे. जेणेकरून पंचकातील अशुभ परिणाम टाळता येतील.


शुभ कार्य टाळावे


मृत्यू पंचक काळात शुभ कार्य टाळावे नावाप्रमाणेच हा पंचक मृत्यूसारखा त्रासदायक आहे. या पाच दिवसात कोणत्याही प्रकारचे जोखमीचे काम करू नये. याच्या  प्रभावामुळे वाद, दुखापत तसेच अपघातचा धोका असतो. पंचकच्या वेळी लाकूड खरेदी करणे, घरावर छप्पर बांधणे, मृतदेह जाळणे, पलंग बनवणे अशी कामे करु नयेत. प्रवास करत असल्यास दक्षिणेकडे जाणे टाळावे.