Shadi Shubh Muhurta November December 2024: हिंदू धर्मात लग्न या संस्थेला अधिक महत्त्व आहे. शुभ मुहूर्त पाहून लग्न केलं जातं. असं म्हटलं जातं की, अशुभ किंवा चुकीच्या मुहूर्तावर लग्न केलं तर ते यशस्वी होत नाही. याचमुळे लग्न करताना मुहूर्त आणि तारीख पाहून केलं जातं. यासाठी तज्ज्ञ ज्योतिषींकडून लग्नासाठी शुभ मुहूर्त पाहिला जातो. 12 नोव्हेंबर रोजी देवउठनी एकादशी आहे. या दिवशी भगवान विष्णू 4 महिन्यांच्या मोठ्या कालावधीनंतर उठले होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ज्योतिषांच्या मते, यावर्षी देवउठणी एकादशीला सर्वाधिक विवाह होणार आहेत. त्यामुळे बँक्वेट हॉल, कम्युनिटी सेंटर, मॅरेज हॉल, पार्क, बँड वाद्ये आणि केटरर्सपासून सर्व काही बुक करण्यात आले आहे. अशा स्थितीत 12 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी रस्त्यावर वाहतूक कोंडीही लोकांना दिसू शकते. अंदाजानुसार, या दिवशी सुमारे 30 हजार ते 40 हजार विवाह होऊ शकतात.


12 तारखेलाच इतकं महत्त्व का?


ज्योतिषी सांगतात की, देवउठणी ग्यारस १२ नोव्हेंबरला आहे. असे म्हणतात की, ज्या लोकांना लग्नासाठी शुभ मुहूर्त मिळत नाही त्यांचे लग्न देवउठणी ग्यारसावर होऊ शकते. हा दिवस विवाहासाठी अतिशय शुभ मानला जातो आणि या तारखेला लग्नासाठी शुभ मुहूर्त किंवा पूजा करण्याची आवश्यकता नाही. याच कारणामुळे बहुतेक विवाह याच तारखेला होतात.


मंगळ असलेले लोकंही करु शकतात लग्न 


ज्यांच्या  लग्न पत्रिकेत मांगलिक दोष आहे म्हणजे ज्यांना मंगल आहे. अशा लोकांचे लग्न देवउठणी ग्यारसावर होऊ शकते का? ज्योतिषांच्या मते, उत्तर होय आहे. हिंदू धर्माच्या विद्वानांच्या मते, शुभ जोडप्यांना त्यांच्या ग्रहांची स्थिती आणि कुंडलीतील दोष विचारात न घेता या शुभ तारखेला विवाह करता येतो. असे केल्याने त्यांना कोणताही मांगलिक दोष जाणवत नाही.