Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयाला सोनं का खरेदी करतात? सोनं खरेदीचा शुभ मुहूर्त, तिथी काय?
Akshaya Tritiya 2024 : साडेतीन मुहूर्तापैकी अर्धा मुहूर्त म्हणजे अक्षय्य तृतीयाचा मुहूर्त असतो. यादिवशी सोनं खरेदीला विशेष महत्त्व असतो. पण अक्षय्य तृतीयाला सोनं खरेदी का करतात? यामागे पौराणिक कथा आहे का?
Akshaya Tritiya 2024 : धार्मिक आणि पौराणिक मान्यतेनुसार हिंदू धर्मात अक्षय्य तृतीयेला विशेष महत्त्व आहे. साडेतीन मुहूर्तापैकी अक्षय्य तृतीया हा अर्धा मुहूर्त आहे. यादिवशी शुभ कार्यासाठी कुठल्याही मुहूर्ताची गरज नसते. यादिवशी सोने-चांदी खरेदीपासून लग्न, शुभ कार्य. गृहप्रवेश आणि मुंडन, कार किंवा घर खरेदी करण्यात येते. हा दिवश खरेदीसाठी अतिशय महत्त्वाचा मानला जातो. अक्षय्य तृतीयेपासून सत्ययुग आणि त्रेतायुग सुरू होतं अशी मान्यता आहे. यादिवशी सोनं खरेदी का केलं जातं? असा प्रश्न जर तुम्हालाही पडला असेल तर पंडीत आणि आनंदी वास्तू आनंद पिंपळकर यांनी मार्गदर्शन केलंय. (Why buy gold on Akshaya Tritiya 2024 date and What is the auspicious time to buy gold shubh muhurta )
अक्षय्य तृतीया कधी आहे?
पंचांगानुसार वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथी शुक्रवार 10 मे 2024 पहाटे 4.17 वाजेपासून शनिवारी 11 मे 2024 पहाटे 02:50 वाजेपर्यंत असणार आहे. उदय तिथीनुसार शुक्रवार 10 मे 2024 अक्षय्य तृतीया साजरी करण्यात येणार आहे.
अक्षय्य तृतीया असं का म्हणतात?
ज्योतिषशास्त्र पंडीत आनंद पिंपळकर म्हणतात की, पौराणिक कथेनुसार ब्रम्हदेवाचा मुलगा अक्षय कुमारचा हा वैशाख शुक्ल तृतीया तिथीला झाला. म्हणून या तिथीला अक्षय्य तृतीया असं म्हटलं जातं.
अक्षय्य तृतीयाला सोनं का खरेदी करतात?
अक्षय्य तृतीयाबद्दल अशी मान्यता आहे की, यादिवशी केलेल्या शुभ कार्याला चौपट फळ म्हणजे अक्षय प्राप्त होतं आणि त्या वस्तूची कधीही कमतरता पडत नाही. हिंदू धर्मात सोनं आणि दागिने हे लक्ष्मीचं भौतिक रुप मानलं गेलं आहे. त्यामुळे लक्ष्मीची आपल्या आणि आपल्या घरावर कायम कृपादृष्टी राहावी म्हणून यादिवशी सोनं खरेदीला महत्त्व आहे. एका पौराणिक आख्यायिकेच्या मान्यतेनुसार या दिवशी घेतलेलं सोनं परिधान केल्यास अकाली मृत्यू टळतो.
दुसऱ्या एका कथेनुसार या दिवशी भगवान कुबेर यांना स्वर्गातील संपत्तीचं संरक्षण बनवण्यात आलं होतं. त्यामुळे अक्षय्य तृतीयाला सोने खरेदी करुन कुबेराची पूजा करण्यात येते. यामुळे घरात कायम सुख समृद्धी नांदेत, असा विश्वास आहे.
हेसुद्धा वाचा - Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयाला सोनं - चांदी खरेदी करणं शक्य नाही, तर 'या' 6 गोष्टी खरेदी करुन वाढवा समृद्धी
अक्षय्य तृतीयाला सोनं खरेदीचं शुभ मुहूर्त!
वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तृतीयेला पंचांगानुसार सुकर्म योग असून रात्री 12:08 पासून निर्माण होणार असून तो संपूर्ण दिवस असणार आहे. त्याशिवाय या दिवशी रवियोही आहे. जो सकाळी 5:33 ते 10:37 पर्यंत असणार आहे.
सोनं खरेदीसाठी शुभ मुहूर्त - रात्री 12:18 पासून दुपारी 01:59 वाजेपर्यंत
रात्री शुभ मुहूर्त - 09:40 वाजेपासून 10:59 वाजेपर्यंत
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)