स्मशानातून आल्यावर आंघोळ करण्याची आणि कपडे बदलण्याची का आहे प्रथा? शास्त्रीय कारण काय?
Funeral Tradition : हिंदू धर्मात स्मशानातून आल्यावर कपडे बदलण्याची आणि आंघोळ करण्याची प्रथा आहे. यामागे धार्मिक आणि शास्त्रीय अशी दोन्ही महत्त्वाची कारणे आहेत.
Last Rite Rituals : अंत्यसंस्काराशी संबंधित एक अशी परंपरा आहे जी आपण वर्षानुवर्ष फॉलो करत आहे. ज्यामागे फक्त धार्मिक नाही तर आध्यात्मिक कारण देखील आहे. सामान्यपणे हिंदू लोक स्मशानातून घरी आल्यावर आंघोळ करतात आणि कपडे देखील बदलतात. पण तुम्हाला कधी हा प्रश्न पडला आहे का, की यामागचं कारण काय? यामागचं प्रमुख कारण म्हणजे स्मशानात सतत शव जाळले जातात यामुळे निगेटिविटी एनर्जीचा वास असतो. जी एखाद्या व्यक्तीवर प्रभाव पाडू शकते. यामुळेच स्मशानातून आल्यावर नदी किंवा घरी जाऊन आंघोळ केली जाते. यामुळे शरीरातील निगेटिव्ह एनर्जीचा ऱ्हास होतो.
वैज्ञानिक कारण
यामागचं वैज्ञानिक कारण म्हणजे आधीच्या काळात हॅपेटायटिस, चेचक सारखे संक्रमित होणाऱ्या आजारावर कोणतीही लस नसायची. या आजाराने जर कोणती व्यक्ती मृत पावली तर शरीर बॅक्टेरियाशी लढू शकत नाही आणि ती डिकम्पोज होऊ लागते. अंत्यसंस्कारात सहभागी होणारे व्यक्ती या बॅक्टेरियाच्या संपर्कात येतात. या अशा आणि यासारख्या दुसऱ्या संक्रमित आजारांपासून बचाव करण्यासाठी आपल्या आंघोळ करण्याची परंपरा आहे. घरी गेल्यावर लगेच आंघोळ केल्यावर संक्रमणाचा धोका रोखला जातो.
अंत्यसंस्कारादरम्यान ठेवावे अंतर
महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारत समशीतोष्ण क्षेत्रात येते. यामुळे डिकम्पोझिशन प्रोसेस झपाट्याने होता. ही प्रक्रिया हळू करण्यासाठी शवाला बर्फाच्या स्लॅबवर ठेवले जाते. यामुळेच अंत्यसंस्कारात सहभागी होणाऱ्या लोकांनी आंघोळ करणे आवश्यक आहे.
तसेच कावळे, गिधाड आणि इतर पक्षी सामान्यपणे स्मशानभूमीजवळच आढळतात. यांच्यामुळे इतर संसर्गजन्य आजार होण्याची दाट शक्यता असते. यामुळे स्वच्छतेच्या दृष्टीकोनातून स्मशानातून आल्यावर आंघोळ करणे गरजेचे असते.
घरी गेल्यावर कशालाही स्पर्श करु नही
स्मशानातून घरी गेल्यावर कशालाही स्पर्श करु नका. कारण हे जीवजंतू घरातील गोष्टींना स्पर्श केल्यावर पसरु शकतात. एवढंच नव्हे तर जवळच्या व्यक्तीच्या जाण्याचं दुःख खूप असतं. अशावेळी जर आंघोळ केल्यावर दिनक्रम चांगला होण्यास मदत होते. यामुळे त्या व्यक्तीला तो दिवस पुढे घेऊन जाण्याची एक प्रेरणा मिळते.