Why we Celebrate Dahi Handi : अख्खा देशात श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्साह मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतोय. महाराष्ट्रात जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी दहीहंडीचा उत्साह साजरा करण्यात येतो. मराठी पंचांगानुसार श्रावण कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करण्यात येते. तर श्रावण कृष्ण पक्षातील नवमी तिथीला गोपाळकाला म्हणजे दहीहंडीचा उत्साह साजरा होतो. तुम्ही कधी विचार केलाय का? की, जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशीच दहीहंडी का फोडली जाते? (Why is Dahi Handi Celebrate on the second day of Janmashtami)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रोहिणी नक्षत्रात रात्री 12 वाजता बाळ गोपाळाचा जन्म झाला. लहानपणापासून कृष्णलीला पाहून मथुरानगरी आश्चर्यचकित व्हायची. पौराणिक कथेनुसार श्रीकृष्ण दही लोणी चोरायचा. सवंगडी घेऊन दही, दूध आणि लोणी चोरून चोरुन खायचा. त्यामुळे त्याला माखन चोर असही म्हणतात. या नटखट बाळगोपाळामुळे गवळणी त्रासल्या होत्या. म्हणून त्या उंचावर एका मटक्यात लोणी बांधून ठेवायचा. जेणे करुन कृष्ण तिथे पोहोचून नये. पण थरावर थर लावून बालगोपाळ त्या मटकी पर्यंत पोहोचायचा. 


जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी का फोडली जाते दहीहंडी? 


असं मानलं जातं की भगवान श्रीकृष्णाने आपल्या बालस्वरूपात भगवान इंद्राच्या क्रोधापासून लोकांचे रक्षण करण्यासाठी गोवर्धन पर्वत उचलला होता. या घटनेनंतर गोपींनी कृष्णाची स्तुती करत दहीहंडी बांधली होती आणि तरुणांना ती फोडण्याचं आव्हान केलं. असं मानलं जातं की तेव्हापासून ही परंपरा हळूहळू संपूर्ण देशात पसरली आणि तो विशेष दिवस दहीहंडी उत्सव म्हणून साजरा केला जाऊ लागला. 
दहीहंडी फोडणे हे भगवान श्रीकृष्णावरील भक्ती आणि प्रेमाचं प्रतीक मानलं जातं. दहीहंडीच्या आयोजनात उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण आहे. हंडी उंचावर टांगून ती तोडण्याचा प्रयत्न हे या उत्सवाचे मुख्य आकर्षण आहे. मुंबईत हा उत्साह मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. 


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)