Friday 13th: तारखेचा शुक्रवार अशुभ मानला जातो हे सर्वांनाच माहीत आहे. 13 आकड्यालाही अशुभ मानले जाते त्यामुळे या आकड्याशी संबंध येईल असे कोणतेच काम केले जात नाही. नॉर्स पौराणिक कथांमध्येही 13 तारिख अशुभ मानली आहे. जसे हॉटेलमध्ये 13 नंबरची रूम, गाडीच्या नंबर 13 न ठेवणे, बिल्डिंगमध्ये 13वा मजला अशा गोष्टींसाठी लोक 13 आकडा वापरणे टाळतात. हॉलिवूडमध्ये या संबंधीत सिरीजही प्रदर्शित करण्यात आली आहे. अनेक जण 13 नंबर संबंधीत गोष्टी घेणे किंवा वापरणे घाबरतात. कारण 13 तारखेला अशुभ तारिख मानतात. खरंतर या मागचे खरे कारण फार कमी लोकांना माहिती आहे.  


13 आकड्याला का अशुभ मानला जाते? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खरंतर, 13 आकडा अशुभ असण्याचे कारण येशू ख्रिस्ताशी संबंधित आहे. अशी मान्यता आहे की, एका व्यक्तीने येशू ख्रिस्ताचा मोठा विश्वासघात केला होता. त्या दिवशी 13 तारिख होती आणि त्या व्यक्तीने येशू ख्रिस्त 13व्या खुर्चीवर बसलेले असताना त्यांच्यासोबत जेवण केले. म्हणूनच तेव्हापासून लोक 13 ला अशुभ मानू लागले. त्यामुळेच लोक 13 आकड्याशी संबंधित कोणत्याही गोष्टींपासून दूर राहतात.


13 आकड्याशी संबंधीक रोमांचक किस्से


13 आकड्याशी संबंधीत वेगवेगळे भयावह किस्से जगभर ऐकायला मिळतात, त्यामुळे त्याबद्दल सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. 


चंदीगड शहराची विभागणी सेक्टर्समध्ये करण्यात आली आहे. पण या शहरात 13 क्रमांकाचे सेक्टरच नाही. या शहराला एका विदेशी आर्किटेक्टने डिजाइन केले होते आणि तो 13 आकड्याला अशुभ मानत होता म्हणून त्याने 13 क्रमांकाचे सेक्टर तयार केले नाही. 12 नंतर त्याने 14 क्रमांकाचे सेक्टर केले. 


अनेक हॉटेल्समध्ये 13 नंबरची रूम किंवा 13 नंबरचा मजला नसतो. याच प्रमाणे रेसिडेंशियल आणि कमर्शिल बिल्डिंगमध्येही 13 नंबरचा मजला नसतो. 13 नंबरला ते 14 नंबर देतात.  


अनेक पाश्चिमात्य देशात लोक ज्या 13 तारखेला शुक्रवार येतो च्या दिवशी प्रवास करणे टाळतात. त्यांच्या मनात भीती असते की अशा दिवशी काहीतरी अशुभ घटना घडू शकते. अनेक जण या गोष्टीवर हसतात. तर काही लोक या दिवशी वाईट घटना घडल्याचेही सांगतात. पण डॉक्टर याला फक्त माणसाच्या मनात असलेली भीती मानतात. 13 नंबर टाळण्याच्या प्रयत्नाला किंवा 13 क्रमांकाबद्दलच्या या भीतीला ट्रिस्कायडेकाफोबिया (Triskaidekaphobia) किंवा थर्टीन डिजीट फोबिया (13 Digit Phobia) असे म्हणतात.