Vijayadashami 2024 : विजयादशमी हा सण का साजरा करण्यात येतो? सीमोल्लंघन म्हणजे नेमकं काय?
Dasara 2024 : दसरा म्हणजे विजयादशमीचा हा सण साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असतो. दसऱ्याच्या दिवशी सीमोल्लंघन करण्याला खूप महत्त्व आहे. पण सीमोल्लंघन म्हणजे काय समजून घेऊयात.
Dasara 2024 : वाईटावर चांगल्याचा विजय म्हणजे दसऱ्याचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. यंदा हा सण 12 ऑक्टोबर शनिवारी साजरा करण्यात येणार आहे. हिंदू धर्मातील हा सर्वात मोठा सण मानला जातो. दसऱ्याच्या दिवशी सीमोल्लंघन करण्याला खूप महत्त्व आहे. विजयादशमी हा सण का साजरा करण्यात येतो. जाणून घ्या संपूर्ण माहिती. (Why is Vijayadashami or Dasara or Dussehra celebrated what exactly is seemollanghan )
सीमोल्लंघन म्हणजे नेमकं काय?
दसरा म्हणजे सीमोल्लंघनाचा दिवस. सीमोल्लनंघन म्हणजे सीमा ओलांडणे आपल्याला याचा वेगळा अर्थही घेता, येईल...आपल्या समाजात काही विचित्र रूढी आहेत धर्मभेद आहेत, जातीभेद आहेत, उच्चनीच हा भेदभाव आहे. अनेक लोक अत्यंत गरीब आहेत त्यांना पुरेसे धान्य वस्त्र मिळत नाही, राहायला घरेही नसतात, अशा वाईट सीमांनी आम्हाला वेढले आहेत. आमचे सामाजिक जीवन गढूळ केले आहे. या सीमांचे उल्लंघन आम्हाला करावयाचे आहे. भेदभाव न्ष्ट करून बंधुभाव निर्माण करायचा आहे.
सरस्वती आणि लक्ष्मी म्हणजे ज्ञान आणि धन यांची उपासना करायची आहे. यांची प्राप्ती करायची आहे. सीमा ओलांडायची आहे म्हणजे प्रगतीच्या मार्गात एक पाऊल पुढे टाकायचे आहे. आम्ही हे केलं तर दसरा साजरा केल्यासारखे होईल खरं सोनं आमच्या हाती लागेल.
हेसुद्धा वाचा - Dasara 2024 : दसऱ्याला 'सोनं' म्हणून आपट्याची पानंच का लुटतात? धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व जाणून घ्या
का साजरी केली जाते विजयादशमी?
विजयादशमी हा सण सत्याच्या असत्यावर विजयाचा सण म्हणून साजरा केला जातो. या दिवशी देवांनी मदतीची याचना केल्यानंतर दुर्गा देवीने कात्यायनी रुपात महिषासुर नावाच्या राक्षसाचा वध केला होता अशी मान्यता आहे. त्याआधी दुर्गा देवी आणि महिषासुर यांच्यात 9 दिवस युद्ध झाले आणि दहाव्या दिवशी देवीने भगवान शंकराने दिलेल्या त्रिशूळाने महिषासुराचा वध केला. यामुळे माता दुर्गेला महिषासुर मर्दिनी असेही म्हणतात. अश्वीन शुक्ल प्रतिपदेला हे सुद्ध सुरु झाले आणि दशमी तिथीला महिषासुराचा वध झाला. यामुळे हा दिवस विजयादशमी म्हणून साजरा केला जातो.
दसरा 2024 तिथी
पंचांगानुसार आश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील दशमी तिथी 12 ऑक्टोबरला सकाळी 10.57 पासून सुरू होत आहे. त्याच वेळी, ते दुसऱ्या दिवशी म्हणजेच 13 ऑक्टोबर रोजी सकाळी 09:07 वाजेपर्यंत असणार आहे. उदय तिथीनुसार 12 ऑक्टोबर रोजी दसरा सण साजरा केला जाईल. कारण रावण दहन प्रदोष काळात केला जातो.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)