Transgender: तृतीयपंथी समाज रात्री अंत्यसंस्कार का करतो? मृत्यूनंतर जल्लोष करण्यामागचं कारण जाणून घ्या
तृतीयपंथी समाजाचं आपल्याला आसपास नेहमीच दर्शन होत असतं. तृतीयपंथी वर्गाबद्दल जनमानसात अनेक रहस्यमयी कथा आहेत.
Transgender Last Rites Mistory: तृतीयपंथी समाजाचं आपल्याला आसपास नेहमीच दर्शन होत असतं. तृतीयपंथी वर्गाबद्दल जनमानसात अनेक रहस्यमयी कथा आहेत. यामुळे या वर्गाची इतर समाजात वेगळीच प्रतिमा आहे. या समाजाबाबत प्रचंड कुतुहूल देखील आहे. हिंदू धर्मशास्त्रानुसार तृतीयपंथींयांनी दिलेले आशीर्वाद फळतात, अशी मान्यता आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी शुभकार्यात तृतीयपंथीयांना आमंत्रित केलं जातं. घरी लहान बाळ आलं की तृतीयपंथीयांकडून आशीर्वाद घेतले जातात. असंच तृतीयपंथीयांच्या मृत्यूबाबत रहस्यमयी कथा आहेत. तृतीयपंथीय समाजात जेव्हा एखाद्याचा मृत्यू होतो तेव्हा त्याच्या पार्थिव शरीरावर रात्री अंत्यसंस्कार केले जातात. त्याचबरोबर स्मशानात जल्लोष केला जातो. असं तृतीयपंथी समाजात का केलं जातं? जाणून घ्या
तृतीयपंथी समाजाच्या माहितीनुसार, जेव्हा एखाद्याला मृत्यूचा आभास होतो, तेव्हा तो खाणंपिणं सोडून देतो. तसेच घराबाहेर पडत नाही. या दरम्यान देवाची आराधना केली जाते. यावेळी असा जन्म दिला पुढे नको अशी प्रार्थना केली जाते. तसेच मृत्यूनंतर मृतदेह दफन केला जातो. पार्थिव शरीर पांढऱ्या कपड्याने झाकलं जातं, मात्र बांधलं जात नाही. यामुळे आत्मा मुक्त होण्यास त्रास होतो, अशी समाजात मान्यता आहे.
अंत्यविधी कुणीही पाहू नये यासाठी रात्री अंत्यसंस्कार केले जातात. जर कुण्या व्यक्तीने अंत्यसंस्कार पाहिला तर पुढचा जन्म तृतीयपंथीय समाजात होतो, अशी समज आहे. त्यामुळे रात्री अंत्यसंस्कार करण्याची प्रथा आहे.दुसरीकडे मृत्यूनंतर तृतीयपंथी समाजात जल्लोष केला जातो. तसेच आराध्य देवतेचं नामस्मरण करून दान करतात. पुढील जन्मात नरकासारखे जीवन मिळू नये हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)