Nail Shape Personality Test : First Impression is the last impression असं आपण कायम ऐकतं आलो आहे. त्यामुळे आपण प्रत्येक जण आपल्या राहणीमान आणि दिसण्यावर खूप भर देतो. आपली देहबोली आणि आपलं वागणं बोलणं यावरुन इतरांना आपला स्वभाव समजतो. पण काही लोक याला अपवाद असतात, त्यांचा मनात एक आणि वागण्यात एक असतं. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की तुमच्या शरीराचे अवयव लोकांना तुमच्या नकळत तुमच्या स्वभावचे गुपित उघड करतो. तुमच्या नखांचा आकार आताच पाहूनच घ्या अन्यथा, तुमच्या मनातील विचार इतरांना कळेल. हो नखांच्या आकारवरुन तुमच्या स्वभाव समजू शकतो, झालात ना अवाक्...(your nails say everything about you meaning nail shape personality test in marathi)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


उभी लांब नखं (Long Nail Shape)


उभी लांब नखं असलेल्या व्यक्ती कशा असात हे आता आपण जाणून घेऊयात. ज्यांची नखं उभी आहेत ती लोक सर्जनशील, कल्पनारम्य, सूक्ष्म आणि तपशील-केंद्रित स्वभावाची असतात. ही व्यक्ती शांत, स्वतंत्र आणि व्यावहारिक असतात. त्याशिवाय सर्जनशील आणि तार्किक असतात ही लोकं. तुम्ही मऊ स्वभावचे आणि सहज प्रवृत्तीचे असता. तणाव आणि दबाव हाताळण्याची क्षमता तुमच्याकडे असते. 



रुंद नखं (Wide Nail Shape)


तुमची नखं रुंद असेल तर मोकळेपणा आवडणारे, अर्थपूर्ण जगण्यावर विश्वास ठेवणारे, विश्वासार्ह असतात. प्रवाहाच्या विरोधात जाण्याची तुमची क्षमता असते. तुम्हाला नवीन कल्पना आवडतात. तुमच्या कल्पना जरी वेगळ्या असल्या तरी तुम्ही इतरांच्या कल्पनांचं स्वागत करता. त्यामुळे तुमचं व्यक्तिमत्व इतरांना खूप आकर्षित करतात. तुम्ही एक उत्तम श्रोते तर असताच पण एक सहानुभूती व्यक्तीदेखील असता.  वचनबद्धतेचं पालन करणे तुम्हाला आवडतं. 



गोल नखं (Round Nail Shape)


गोल नखं असलेली लोकं कशी असतात ते पाहूयात. अतिशय शांत असतात. त्याशिवाय ही व्यक्ती सहजासहजी अस्वस्थ किंवा तणावग्रस्त होतं नाहीत. प्रेशरमध्येही ही व्यक्ती उत्तम काम किंवा निर्णय घेतात. ही लोक जिज्ञासू असतात. या लोकांना नवीन नवीन गोष्टी शिकायला आणि माहिती करुन घ्यायला आवडतं. ताज्या घडामोडी आणि ट्रेंडसोबत त्या अपडेट असतात. तुमचा स्वभाव खूप लवचिकही असतो. तुम्ही अडथळ्यांवर सहज मात करता. 



स्क्वेअर नखं (Square Nail Shape)


अशी नखं असलेल्या व्यक्तीची पर्सनॅलिटी खूप आकर्षित असते. ते स्वतंत्र विचाराचे असतात. तुम्हाला तुमच्या स्वभावानुसार जगायला आवडतं. आयुष्यातील समस्यांवर मार्ग काढण्यात तुमचा हातखंड आहे. तुम्ही कायम नाविन्यपूर्ण मार्गाच्या शोधात असता. जोखीम पत्कराला तुम्ही कायम तयार असता. त्यासोबत तुम्ही महत्त्वाकांक्षी असता.  


(वरील माहितीचा कोणताही पुरावा नसल्यामुळं ती केवळ सर्वसामान्य संदर्भांआधारे घेण्यात आली आहे. झी 24 तास याची खातरजमा करत नाही.)