मुंबई : लग्नानंतर आपल्या जोडीदाराने आपल्यावर मनापासून प्रेम करावं असं वाटत असतं. प्रत्येक पुरूषाला वाटत असतं की, आपल्या बायकोने आपल्यावर जीवापाड प्रेम करावं. तिने फक्त आणि फक्त आपल्यावर जीव ओवाळून टाकावा असं वाटत असतं. काही मुलींचा स्वभाव हा अगदी भावूक असतो तर काहींचा अगदी फटकळ अशात आपल्याला चांगली मुलगी कशी मिळेल असा प्रश्न सगळ्या मुलांना असतो. अशावेळी चांगली लाईफ पार्टनर मिळावी म्हणून या आद्याक्षरावरून नाव असणाऱ्या मुलीशी नक्की लग्न करा. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

A अक्षरापासून सुरू होणाऱ्या नावाच्या मुली 
या नावाच्या मुलींचा स्वभाव हा चंचल असतो. या मुलींचा कुटूंब आणि समाज व्यवस्थेवर विश्वास असतो. त्यानुसार या मुली व्यवहार करतात. या मुली आपल्या करिअरबद्दल सिरियस असून यश संपादन करतात. महत्वाचं म्हणजे या मुली आपल्या जोडीदाराला चांगली साथ देतात आणि भरभरून प्रेम करतात. 


S अक्षरापासून सुरू होणाऱ्या नावाच्या मुली 
या नावाच्या मुलींची बुद्धी लहानपणापासूनच चांगली असते. अभ्यासामध्ये या मुली हुशार असून करिअरमध्ये चांगल्या पदावर जातात. यांचे वैवाहिक आयुष्य यशस्वी असते. यांचा स्वभाव आणि दयाळू आणि कोमल असतो. या मुलींना कुणाची निंदा केलेली आवडत नाही. आणि त्या स्वतः देखील निंदा करण्यात रस घेत नाही.नेहमी सत्याच्या बाजूने उभ्या असलेल्या या मुली कायम आपल्या जोडीदाराची साथ देतात ते ही आयुष्यभर. 


H अक्षरावरून सुरू होणाऱ्या नावाच्या मुली
H अक्षरावरून नाव सुरू झालेल्या मुलीचा स्वभाव जिद्दी असतो. पण यांचा स्वभाव जोडीदाराला मात्र फायदा करून देतो. त्यांच्या या स्वभावामुळे जीवनामध्ये आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी त्या मिळवतात. आपल्या मनामध्ये कोणाबद्दलही वाईट भावना ठेवत नाही. त्यामुळे या मुली आपल्या जोडीदारासोबत खंबीर उभी राहते. 


P अक्षरावरून सुरू होणाऱ्या नावाच्या मुली
P नावाच्या मुली साफ मनाच्या असतात. या मुली अतिशय रोमांटिक असतात. त्यामुळे या आपल्या नवऱ्यावर खूप प्रेम करतात.  खरेपणा आणि इमानदारी असल्यामुळे या मुली आपल्या जोडीदाराला खूप चांगली साथ देतात. या मुली आपलं मन धार्मिक कामात अधिक गुंतवणात. तसेच सतत सकारात्मक विचार करतात.