Rider Shreyas Harish Dies In Racing : इरुंगट्टुकोट्टई रेस सर्किटमध्ये एका 13 वर्षीय तरुण बाईक रेसरचा शर्यतीदरम्यान मृत्यू झाला. कोपराम श्रेयस हरीशने एमआरएफ मद्रास मोटर स्पोर्ट्स क्लब आणि फेडरेशन ऑफ मोटर स्पोर्ट्स क्लाइव्ह ऑफ इंडियाच्या शर्यतीत भाग घेतला होता. तिसऱ्या फेरीत 200 सीसी मोटरसायकल चालवत असताना त्याची मोटरसायकल घसरला आणि त्याचं हेल्मेट निघालं आणि तो डोक्यावर आपटला. त्याच वेळी श्रेयसच्या मागे येणारा दुसरा रायडर वेळीच थांबू शकला नाही आणि दुर्दैवाने श्रेयसच्या अंगावर गेला. (13 year old bike rider shreyas harish dies in racing accident banglore chennai track video)



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या दुर्घटनेनंतर शर्यत तात्काळ थांबवण्यात आली आणि ट्रॅकवर उभ्या असलेल्या ट्रॉमा केअर रुग्णवाहिकेतून त्याला जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. पण दुदैवाने हॉस्पिटलला पोहोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचा डॉक्टरांनी सांगितलं. त्यावेळी त्यांचे वडील कोप्पाराम हरीश त्यांच्यासोबत होते. यापूर्वी जानेवारीमध्ये 59 वर्षीय के.ई. मद्रास इंटरनॅशनल सर्किटमध्ये सलून कार रेसिंग त्यांचा मृत्यू झाला आहे.



बेंगळुरूमध्ये 26 जुलै 2010 मध्ये श्रेयस हरीश यांचा जन्म झाला होता. बेंगळुरूमधीलच केन्सारी शाळेचा तो विद्यार्थी आहे. श्रेयसने पेट्रोनास TVS वन-मेक चॅम्पियनशिपच्या रुकी प्रकारात स्पर्धा करताना या हंगामात सलग चार शर्यतींसह राष्ट्रीय स्तरावर अनेक शर्यती जिंकल्या.




श्रेयस हरीशने भारतातील FIM Mini-GP मध्ये आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली आणि 2022 मध्ये चॅम्पियनशिप जिंकली. त्यानंतर त्याने राष्ट्रीय चॅम्पियनशिपमध्ये भाग घेतला आणि काही पोडियम पूर्ण केल्यानंतर, TVS ने त्याची रुकी कपसाठी निवड केली.