डबलिन : येथे सुरु असलेल्या क्रिकेट स्पर्धेत न्यूझीलंडची १७ वर्षीय महिला क्रिकेटपटू एमेलिया केर हिने विक्रम केलाय. तिने नाबाद २३२ धावा फटकावत आयर्लंडविरुद्ध द्विशतक झळकावले आहे. एलेमिया ही सर्वात कमी वयात वनडेत द्विशतक झळकावणारी पहिली क्रिकेटपटू ठरली आहे. दरम्यानच्या काळात तिला दोन वेळा जीवदानही मिळाले. केरच्या वनडे कारकिर्दीतील हे पहिलेच शतक आहे. यापूर्वी तिचा बेस्ट स्कोअर होता नाबाद ८१ धावा. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

द्विशतक झळकावणारी बेलिंडा क्लार्कनंतर एमेलिया ही दुसरी महिला क्रिकेटपटू बनली आहे. एलेमियाने ऑस्ट्रेलियाची फलंदाज बेलिंडा क्लार्क हिने २१ वर्षांपूर्वी केलेले नाबाद २२९ धावांचे वर्ल्ड रेकॉर्ड मोडलाय. १६ डिसेंबर, १९९७ मध्ये क्लार्कने डेनमार्कविरुद्ध १५५ चेंडूंत नाबाद २२९ धावा केल्या होत्या. 


१४५ चेंडूंत केल्या २३२ धावा 


सलामीची फलंदाज एमेलिया हिने आयर्लंडविरुद्ध धडाकेबाज फलंदाजी करत केवळ १५४ चेंडूंत नाबाद २३२ धावा केल्या. या डावात तिने ३१ चौकार आणि २ षटकार ठोकले. तिचा स्ट्राइकरेट १६० इतका होता. तिच्या आणि कॉस्परेकच्या (११३) शतकांच्या जोरावर न्यूझीलंडने आयर्लंडविरुद्ध ५० षटकांमध्ये तीन बाद ४४० धावांचा डोंगर उभा केला. तसेच या दोघींव्यतिरिक्त न्यूझीलंड संघासाठी सलामीची फलंदाज एमी स्टेर्थवेटने ४५ चेंडूंमध्ये ६१ धावा केल्या.



Pic Courtesy: Twitter/@WHITE_FERNS 


न्यूझीलंडने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आपल्या कारकिर्दीतील केवळ २०वा वनडे खेळणाऱ्या केरने सामन्याची सुरुवात अतिशय संथ केली. अर्धशतक बनवण्यासाठी तिला ४५ चेंडू खेळावे लागले. त्यानंतर तिने केवळ ३२ चेंडूत पुढच्या ५० धावा जमवल्या. पुढे ७७ चेंडूंमध्ये तिने शतक साजरे केले. १०२ चेंडूत तिच्या १५० धावा पूर्ण झाल्या होत्या. १३४व्या चेंडूवर चौकार ठोकून तिने २०० धावा पूर्ण केल्या. 


द्विशतक करणारे फलंदाज 


महिला क्रिकेटपटू 


- बेलिंडा क्लार्क 
-  एमेलिया केर 


पुरुष क्रिकेटपटू 


- रोहित शर्मा ( सर्वोच्च २६४) 
- सचिन तेंडूलकर 
- वीरेंद्र सेहवाग 
- मार्टिन गुप्टिल
- ख्रिस गेल