मुंबई : सचिन तेंडुलकरचं एक रेकॉर्ड मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या फलंदाजांने मोडलं आहे. मुंबईचा पृथ्वी शॉने वयाच्या १७ व्या वर्षी इंडिया ब्लूच्या विरोधात दिलीप ट्रॉफीमध्ये पदार्पण करत शतक ठोकलं. पृथ्वीने 249 बॉलमध्ये 14 फोर, 1 सिक्सच्या मदतीने 154 रन केले. सोबतच तो दिलीप ट्रॉफी फायनलमध्ये शतक ठोकणारा सर्वात युवा क्रिकेटर ठरला आहे. हा रेकॉर्ड सचिन देखील नाही बनवू शकला होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याबरोबरच पृथ्वी शॉने आणखी एक रेकॉर्ड केला आहे. सचिन तेंडुलकर नंतर दिलीप ट्रॉफीमध्ये शतक ठोकणारा तो दुसरा खेळाडू ठरला आहे. सचिनने जेव्हा दिलीप ट्रॉफीमध्ये खेळणं सुरु केलं तेव्हा सचिनचे वय 17 वर्षे 262 दिवस होतो. तर पृथ्वीचं वय 17 वर्ष 320 दिवस आहे.


टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या इंडिया रेड संघाकडून पृथ्वी आणि कर्णधार दिनेश कार्तिकने देखील शतक ठोकलं. करियरची फक्त तिसरी प्रथम श्रेणी मॅच खेळणाऱ्या पृथ्वीने सर्वोत्तम खेळी केली. याआधी त्याने 120 धावा काढल्या होत्या, जे या वर्षीच्या सुरुवातीला मुंबईसाठी तमिळनाडू विरुद्ध त्याने केल्या होत्या. तेव्हा त्यांने रणजी ट्रॉफीमध्ये पदार्पण केलं होतं.


Sachin Tendulkar West Zone East Zone 11 Jan, 1991 17 years 262 days
Sachin Tendulkar West Zone South Zone 18 Jan, 1991 17 years 269 days
Prithvi Shaw India Red India Blue 25 Sep, 2017 17 years 320 days
Sritam Das East Zone Central Zone 20 Oct, 1986 18 years 71 days
Sourav Ganguly East Zone West Zone 11 Jan, 1991 18 years 187 days