ग्लासोग :  जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेच्या उपांत्यफेरीत भारताची अव्वल महिला बॅडमिंटनपटू पी.व्ही.सिंधूने धडक मारलेय. त्यामुळे भारताच्या पदाची आशा निर्माण झालेय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सिंधूने चीनच्या सून यू वर २१-१४, २१-९ असा विजय मिळवला. तिने अवघ्या ३९ मिनिटात आपल्या प्रतिस्पर्ध्यांला नामोहरण केले. या विजयासह सिंधूने तिचे ब्राँझ मेडल निश्चित केले आहे. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत पदक मिळवणारी ती एकमेव भारतीय आहे. यापूर्वी तिने २०१३ आणि २०१४ असे सलग दोनवेळा वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये ब्राँझ पदक मिळवले आहे. 


रिओ ऑलिम्पिकची रौप्य विजेती भारतीय स्टार सिंधू आणि किदाम्बी श्रीकांत यांनी गुरुवारी येथे सुरू असलेल्या विश्व बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक दिली होती. हाँगकाँगची चेयुंग नागन यी हिचा सिंधूने १९-२१, २३-२१, २१-१७ अशा फरकाने पराभव केला.