Hockey World Cup 2023 : 16 संघ..44 लढती, 13 जानेवारीपासून सुरू होणार हॉकीचं महाकुंभ, पाहा संपूर्ण Schedule
Hockey World Cup: ओडिशामध्ये 13 जानेवारीपासून पुरुष हॉकी विश्वचषकाची (Hockey World Cup 2023) सुरुवात होणार आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना 29 जानेवारीला होणार आहे. जाणून घ्या भारताचे सामने कधी, कुठे होणार पाहा संपूर्ण वेळापत्रक...
Hockey World Cup 2023: क्रीडा विश्वातील नवीन वर्षाची सुरूवात एकदम धमाकेदार झाली आहे. कारण आयसीसी विश्वचषकापूर्वी भारतीय क्रिकेट संघाचे मायदेशात सामने सुरू आहेत. अशातच आता ओडिशामध्ये 13 जानेवारीपासून (Odisha) पुरुष हॉकी विश्वचषकाची (Hockey World Cup) सुरुवात होणार आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना 29 जानेवारीला होणार आहे. भारतासह 16 संघाने या स्पर्धेत सहभाग घेतला. 16 संघाला चार ग्रुपमध्ये विभागण्यात आले असून 44 सामने होणार आहे. हॉकी विश्वचषकात भारतीय संघाची धुरा हरमनप्रीत सिंह याच्याकडे आहे. हॉकी विश्वचषक सलग दुसऱ्यांदा भारतामध्ये होत आहे. दरम्यान हॉकी विश्वचषक 2023 (Hockey World Cup 2023) चे यजमानपद भारताला मिळाले असून, सर्व सामने राउरकेला-भुवनेश्वर, ओडिशा येथे होणार आहेत.
भारतीय संघाचे सामने कधी होणार
भारत विरुद्ध स्पेन – 13 जानेवारी संध्याकाळी 7 वाजता
भारत विरुद्ध इंग्लंड – 15 जानेवारी संध्याकाळी 7 वाजता
भारत विरुद्ध वेल्स – 19 जानेवारी संध्याकाळी 7 वाजता
हॉकी विश्वचषकाचे संपूर्ण वेळापत्रक
13 जानेवारी
दुपारी 1 वाजता – अर्जेंटिना विरुद्ध दक्षिण आफ्रिका
दुपारी 3 वाजता – ऑस्ट्रेलिया विरुद्ध फ्रान्स
संध्याकाळी 5 वाजता – इंग्लंड विरुद्ध वेल्स
संध्याकाळी 7 वाजता – भारत विरुद्ध स्पेन
14 जानेवारी
दुपारी 1 वाजता – न्यूझीलंड विरुद्ध चिली
दुपारी 3 वाजता – नेदरलँड विरुद्ध मलेशिया
संध्याकाळी 5 वाजता – बेल्जियम विरुद्ध कोरिया
संध्याकाळी 7 वाजता – जर्मनी विरुद्ध जपान
15 जानेवारी
संध्याकाळी 5 – स्पेन विरुद्ध वेल्स
संध्याकाळी 7 – इंग्लंड विरुद्ध भारत
16 जानेवारी
दुपारी 1 वाजता – मलेशिया विरुद्ध चिली
दुपारी 3 वाजता – न्यूझीलंड विरुद्ध नेदरलँड
संध्याकाळी 5 वाजता – फ्रान्स विरुद्ध दक्षिण आफ्रिका
संध्याकाळी 7 वाजता – अर्जेंटिना विरुद्ध ऑस्ट्रेलिया
17 जानेवारी
संध्याकाळी 5 वाजता – कोरिया विरुद्ध जपान
संध्याकाळी 7 वाजता – जर्मनी विरुद्ध बेल्जियम
19 जानेवारी
दुपारी 1 वाजता – मलेशिया विरुद्ध न्यूझीलंड
दुपारी 3 वाजता – नेदरलँड विरुद्ध चिली
संध्याकाळी 5 वाजता – स्पेन विरुद्ध इंग्लंड
संध्याकाळी 7 वाजता – भारत विरुद्ध वेल्स
20 जानेवारी
दुपारी 1 वाजता – ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका
दुपारी 3 वाजता – फ्रान्स विरुद्ध अर्जेंटिना
संध्याकाळी 5 वाजता – बेल्जियम विरुद्ध जपान
संध्याकाळी 7 वाजता – कोरिया विरुद्ध जर्मनी
24 जानेवारी
दुपारी 4.30 वाजता – पहिली उपांत्यपूर्व फेरी
संध्याकाळी 7.00 वाजता – दुसरी उपांत्यपूर्व फेरी
25 जानेवारी
दुपारी 4.30 वाजता – तिसरी उपांत्यपूर्व फेरी
संध्याकाळी 7.00 वाजता – चौथी उपांत्यपूर्व फेरी
27 जानेवारी
दुपारी 4.30 वाजता – पहिली उपांत्य फेरी
संध्याकाळी 7.00 वाजता – दुसरी उपांत्य फेरी
29 जानेवारी
दुपारी 4.30 वाजता – कांस्यपदक सामना
संध्याकाळी 7.00 वाजता – सुवर्णपदक सामना