क्रिकेट ऑस्ट्रेलियानंतर विस्डनच्या टीममध्येही भारतीयांचा बोलबाला
विस्डनच्या दशकाच्या टीममध्ये ४ भारतीय खेळाडू
लंडन : क्रिकेट ऑस्ट्रेलियाने २०१०-२०१९ या दशकासाठीची टीम घोषित केल्यानंतर आता विस्डननेही त्यांच्या दशकाच्या सर्वोत्तम टीमची घोषणा केली आहे. विस्डनच्या या टीममध्ये विराट कोहलीला टेस्ट आणि वनडेमध्ये सामील करण्यात आलं आहे. तर एमएस धोनी आणि रोहित शर्मा वनडे टीममध्ये आहेत. टेस्ट टीममध्ये रवीचंद्रन अश्विनचाही समावेश करण्यात आला आहे.
विस्डनच्या दशकातल्या सर्वोत्तम टीमला लॉरेन्स बूथ, जो हर्मन, जो स्टर्न, फिल वॉल्कर आणि यश राणा यांच्या ज्युरीने निवडलं आहे. विस्डनच्या टेस्ट टीममध्ये कोहली आणि अश्विनशिवाय कुमार संगकारा, एलिस्टर कूक, डेव्हिड वॉर्नर, स्टीव्ह स्मिथ, बेन स्टोक्स, एबी डिव्हिलियर्स, डेल स्टेन, कगिसो रबाडा आणि जेम्स अंडरसन यांचाही समावेश आहे.
विस्डनच्या दोन्ही टीममध्ये पाकिस्तानच्या टीमचा कोणताही खेळाडू नाही. तर टेस्टमध्ये न्यूझीलंडच्या एकाही खेळाडूला निवडण्यात आलेलं नाही. वनडे टीममध्ये न्यूझीलंडच्या ट्रेन्ट बोल्टला संधी देण्यात आली आहे. तर वनडे टीममध्ये लसिथ मलिंगा हा एकमेव श्रीलंकन खेळाडू आहे.
विस्डन टेस्ट टीम
एलिस्टर कूक, डेव्हिड वॉर्नर, कुमार संगकारा, स्टीव्ह स्मिथ, विराट कोहली, बेन स्टोक्स, एबी डिव्हिलियर्स, रवीचंद्रन अश्विन, डेल स्टेन, कगिसो रबाडा, जेम्स अंडरसन
विस्डन वनडे टीम
रोहित शर्मा, विराट कोहली, डेव्हिड वॉर्नर, एबी डिव्हिलियर्स, जॉस बटलर, शाकीब अल हसन, महेंद्रसिंग धोनी, लसिथ मलिंगा, मिचेल स्टार्क, ट्रेन्ट बोल्ट, डेल स्टेन
क्रिकेट ऑस्ट्रेलियाची वनडे टीम
रोहित शर्मा, हाशीम आमला, विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स, शाकीब अल हसन, जॉस बटलर, एमएस धोनी (कर्णधार), राशिद खान, मिचेल स्टार्क, ट्रेन्ट बोल्ट, लसिथ मलिंगा
क्रिकेट ऑस्ट्रेलियाची टेस्ट टीम
एलिस्टर कूक, डेव्हिड वॉर्नर, केन विलियमसन, स्टीव्ह स्मिथ, विराट कोहली (कर्णधार), एबी डिव्हिलियर्स, बेन स्टोक्स, डेल स्टेन, स्टुअर्ट ब्रॉड, नॅथन लायन, जेम्स अंडरसन