मुंबई : आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2021 ला (ICC T20 World Cup 2021) सुरुवात झाली आहे. या टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेची सुरुवात 2007 मध्ये झाली होती. तेव्हा धोनीने  (MS Dhoni) आपल्या नेतृत्वात टीम इंडियाला (Team India) थरारक सामन्यात वर्ल्ड कप जिंकवून दिला होता. सध्याची ही सातवी टी 20 वर्ल्ड कप स्पर्धा आहे. विशेष म्हणजे या स्पर्धेत असे 6 खेळाडू आहेत, जे वर्ल्ड कपच्या सुरुवातीपासून ते आतापर्यंत खेळतायेत. थोडक्यात काय तर या 6 क्रिकेटपटूंचा हा 7 वा वर्ल्ड कप आहे. या 6 भाग्यवान खेळाडूंमध्ये 3 बांगलादेश, 2 वेस्टइंडिज आणि एक टीम इंडियाच्या खेळाडूचा समावेश आहे. (6 cricketers who have played in all T20 World Cup editon see list)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुशफिकुर रहीम (Mushfiqur Rahim)


बांगलादेशचा (Bangladesh) विकेटकीपर बॅट्समन मुशफिकुर रहीम (Mushfiqur Rahim) आतापर्यंत सर्व टी 20 वर्ल्ड कपमध्ये खेळला आहे. रहीने या स्पर्धेत आतापर्यंत एकूण 28 सामन्यात 307 धावा केल्या आहेत.


शाकिब अल हसन (Shakib Al Hasan)


शाकिब अल हसन या क्रिकेट विश्वातील सर्वोत्तम अष्टपैलूंपैकी एक आहे. शाकिब पहिल्या टी 20 वर्ल्ड कपपासून खेळतोय. शाकिबने 28 मॅचमध्ये 29.34 च्या सरासरीने 675 धावा कुटल्या आहेत. तर 16.41 च्या बॉलिंग एव्हरेजने 39 विकेट्स घेतल्या आहेत. विशेष म्हणजे शाकिबने नुकताच टी 20 क्रिकेटमध्ये वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. शाकिबने टी 20 मध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विश्व विक्रम केल आहे. 


मोहम्मदुल्लाह (Mahmudullah)


बांगलादेशचा ऑलराऊंडर मोहम्मदुल्लाहने (Mahmudullah) आतापर्यंत झालेल्या प्रत्येक टी 20 वर्ल्ड कपमध्ये प्रतिनिधित्व केलं आहे. त्याने 25 सामन्यात 284 धावा आणि 8 विकेट्स घेतल्या आहेत. 


ड्वेन ब्राव्हो (Dwayne Bravo)


ड्वेन ब्राव्होही प्रत्येक टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेत खेळला आहे. विशेष म्हणजे ब्राव्हो 2 वेळा वर्ल्ड कप विजेत्या टीमचा सदस्यही राहिला आहे. ब्राव्होने 29 टी 20 वर्ल्ड कप सामने खेळले आहेत. यात त्याने 504 धावा केल्या असून 25 विकेट्स घेतल्या आहेत. ब्राव्हो या स्पर्धेनंतर निवृत्त होणार आहे.    


ख्रिस गेल (Chris Gayle) 


ख्रिस गेलला युनिव्हर्स बॉस म्हंटलं जातं. गेलचा तडाखा सर्व क्रिकेट चाहत्यांना माहिती आहे. गेलचं वय 42 असलं, तरी त्याच्या खेळीवर वयाचा काहीही परिणाम झालेला नाही. गेलने या स्पर्धेत खेळलेल्या 28 सामन्यांमध्ये 2 शतकांसह 920 रन्स केल्या आहेत. 


रोहित शर्मा (Rohit Sharma)


रोहित शर्मा टी 20 मधील यशस्वी फलंदाजांपैकी एक आहे. रोहित हा एकमेव भारतीय खेळाडू आहे, जो या स्पर्धेच्या सुरुवातीपासून खेळतोय. रोहितला दुर्देवाने या पहिल्या टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेत संधी मिळाली नाही. हिटमॅनने या स्पर्धेत 28 सामन्यात 673 रन्स काढल्या आहेत. रोहित सध्या टीम इंडियाचा उपकर्णधार आहे. यंदाच्या स्पर्धेत रोहितच्या खांद्यावर अनुभवी खेळाडूच्या नात्याने मोठी जबाबदारी आहे.