मुंबई : 83 सिनेमाच्या निमित्ताने पुन्हा काही जुन्या आठवणी आणि किस्से ताजे झाले. टीम इंडियाच्या ऐतिहासिक विजयावर आधारित '83' हा सिनेमा  शुक्रवारी 24 डिसेंबरला प्रदर्शित झाला. या सिनेमातूनही अनेक माहिती नसलेले किस्से क्रिकेट चाहत्यांपर्यंत पोहोचले आहेत. मात्र हा सिनेमा पाहून झाल्यावर एक प्रश्न मानाला सतावत राहातो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टीम इंडियातील एका क्रिकेटपटूचं वर्ल्ड कप दरम्यान लग्न मोडलं. वर्ल्ड कप जिंकल्यानंतर पुढे त्याचं काय झालं? याची चर्चा झाली नाही. ह्या चित्रपटाच्या शेवटीही ही हूरहूर कायम राहाते, की त्या क्रिकेटपटूच्या लग्नाचं पुढे काय झालं असावं.


बलविंदर संधू यांच्यासंदर्भातील हा किस्सा आहे. बलविंदर सिंधू यांच्याकडे मोठं घर नसल्यामुळे त्यांचं लग्न ऐन वर्ल्ड कप स्पर्धे दरम्यान मोडलं होतं. बाकी सगळं हातात असून केवळं मोठं घर नाही म्हणून 1983 च्या वर्ल्ड कप दरम्यान हे लग्न मोडल्याचा किस्सा घडला होता. 


बलविंद संधू यांचं वर्ल्ड कप जिंकल्यानंतर काय झालं. त्याचं लग्न मोडलं त्याचं काय झालं हे प्रश्न मात्र अजूनही अनुत्तरीत आहेत. हा सिनेमा संपला तरी हे प्रश्न मनात कायम घोंगावत राहतात. 


 बलविंदर संधू कोण आहेत? 


मुंबईत जन्मला आलेल्या बलविंदर संधू या वेगवान गोलंदाजाने ओपनर गॉर्डन ग्रीनिजला 1983 च्या वर्ल्ड कपमध्ये क्लीन बॉलिंग केलं होतं. जो वन डे क्रिकेटमधील प्रतिष्ठित खेळाडू होता. तसेच त्याने 11 धावा केल्या आणि डावात दोन विकेट्स घेतल्या. त्यांनी 90 च्या दशकात मुंबई संघाचे प्रशिक्षकपद भूषवलं. 


बलविंदर संधू ऑलराऊंडर क्रिकेटपटू आहेत. त्यांनी 8 कसोटी सामने खेळून 214 धावा केल्या. तर 22 वन डे सामने खेळून 51 धावा केल्या होत्या. त्यांनी 8 कसोटी सामन्यात 10 तर वन डे सामन्यात 16 विकेट्स घेऊन त्या काळी मोलाची कामगिरी केली होती.