Yuzvendra Chahal Viral Video : भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यामध्ये 3 सामन्यांची वनडे सिरीज सुरु असून टीम इंडियाने (Team India) ही सीरिज जिंकली आहे. या सीरिजमधील दुसरा सामना शनिवारी रायपूरमध्ये खेळवला गेला. या सामन्यात टीम इंडियाने न्यूझीलंडवर 8 विकेट्सने मोठा विजय मिळवला. गोलंदाज मोहम्मद शमीने या सामन्यात चांगली कामगिरी केल्याने प्लेयर ऑफ द मॅचचा अवॉर्ड त्याला देण्यात आला. न्यूझीलंडविरूद्धच्या दोन्ही सामन्यांमध्ये युझवेंद्र चहलला (Yuzvendra Chahal) संधी दिली नाही. मात्र तरीही तो चर्चेत असल्याचं दिसून आलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नटखट आणि खोडकर अशी युझवेंद्र चहलची एक वेगळीच ओळख आहे. चहल जरी प्लेईंग 11 मध्ये नसला आणि डगआऊटमध्ये बसला असला तरीही त्याच्या नावाची चर्चा ही असतेच. चहल त्याच्या चहल टीव्हीच्या नावाने मैदानातील खेळाडूंशी मस्ती करताना दिसतो. 


Yuzvendra Chahal पुन्हा आला चर्चेत


नुकत्याच झालेल्या सामन्यात Yuzvendra Chahal ने असं कृत्य केलंय की, त्याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय. या व्हिडीओमध्ये चहलने शाहबाजसोबत अश्लील कृत्य केलं आहे. 


चहलचं अश्लील कृत्य सोशल मीडियावर व्हायरल


न्यूझीलंडविरूद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यामध्ये शुभमन गिलने फोर मारली आणि टीम इंडियाला विजय मिळवून दिला. या विजयानंतर डग आऊटमध्ये भारतीय खेळाडू एकमेकांचं अभिनंदन करत होते. याचवेळी चहल देखील त्याच्या साथीदारांचं हात मिळवून अभिनंदन करत होता. इतक्याचं त्याने शाहबाजसोबत अश्लील कृत्य केलं आणि त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. 



व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये चहल शाहबाज अहमदच्या प्रायव्हेट पार्टला हात लावताना दिसतो. या घटनेने शाहबाज देखील थोडासा गोंधळतो. चहल हे कृत्य करत असतानाच नेमकी कॅमेराची नजर त्याच्यावर पडते आणि घटना कॅमेरात कैद होते.


Yuzvendra Chahal प्लेईंग 11 मध्ये संधी नाही


भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये 3 सामन्यांच्या सीरिजमध्ये 2 सामने खेळवले गेले आहेत. या दोन्ही सामन्यांमध्ये टीम इंडियाने विजय मिळवला आहे. मात्र या दोन्ही सामन्यांमध्ये युझवेंद्र चहलला प्लेईंग 11 मध्ये संधी देण्यात आली नाही. तिसऱ्या सामन्यामध्ये रोहित शर्मा चहलला संधी देऊ शकतो.


टीम इंडियाने जिंकली सीरिज


न्यूझीलंडविरूद्धचा दुसरा वनडे टीम इंडियाने 8 विकेट्सने जिंकला. या सामन्यासह भारताने सीरिज देखील खिशात घातली आहे. या सामन्यात रोहित शर्माची बॅट अखेर तळपली. कर्णधाराने ओपनिंगला उतरत अर्धशतक झळकावलं आणि टीमला विजय मिळवून दिला. अवघ्या 21 व्या ओव्हरमध्ये टीम इंडियाने हे लक्ष्य गाठलं आहे.