Netherlands upset South Africa: डिग्रीचा एक पेपर तुमचं संपूर्ण आयुष्य नाही ठरवू शकत, हे तु्म्हाला कोणातरी सांगितलं असेल किंवा तुम्ही अनेकदा वाचलं असेल. मात्र वर्ल्डकपमध्ये केवळ एका पेपरने दक्षिण आफ्रिकेचा पराभव झालाय. होय, हे खरं आहे. नेदरलँड्सच्या एका पेपरच्या गेम प्लॅनमुळे दक्षिण आफ्रिकेच्या टीमवर पराभवाची नामुष्की ओढावली आहे. या सामन्यानंतर सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसतोय, ज्यामध्ये फिल्डींग करताना नेदरलँड्सच्या खेळाडूंच्या हातात एक पेपर दिसतोय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजीदरम्यान नेदरलँड्सच्या गोलंदाजांच्या हातात एक कागद असल्याचं या व्हायरल व्हिडिओमध्ये दिसतंय. दरम्यान हाच कागद आफ्रिकेसाठी पराभवासाठी जबाबदार ठरला आहे. 


गोलंदाजाने कागद पाहून ठेवला खिशात


सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ त्यावेळचा आहे जेव्हा दक्षिण आफ्रिका फलंदाजीसाठी मैदानात उतरली होती. नेदरलँड्सने दिलेल्या 246 रन्सच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आफ्रिकन टीम आली. यावेळी एक क्षण असा होता की, नेदरलँडचा कर्णधार स्कॉट एडवर्ड्स आणि एक गोलंदाज आपापसात बोलत होते. 


यादरम्यान गोलंदाजाने एक कागद काढला आणि तो वाचला. यावेळी त्याने तो कागद कॅप्टनलाही दाखवला. मग गोलंदाजाने तो कागद खिशात टाकला. आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर आला आहे. या व्हिडिओवर चाहते भरपूर कमेंट येताना दिसतायत. 


दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांसाठी नेदरलँडचा गेम प्लॅन हा वेगळा आणि अगोदरपासूनच तयार होता. डच टीमची ही रणनीती कामी आली. रिपोर्टनुसार, दक्षिण आफ्रिकेच्या विविध फलंदाजांसाठी नेदरलँड्सने वेगवेगळी फिल्डींग ठरवली होती. त्याची माहिती खेळाडूच्या हाती असलेल्या चिठ्ठीमध्ये देण्यात आली होती. या सामन्यादरम्यान असं अनेकदा दिसून आलं की, खेळाडू खिशातून चिठ्ठी काढत होते आणि त्यानुसार फिल्डींग लावत होते.