मुंबई : भारताचा माजी क्रिकेटपटू आणि भारताच्या अंडर १९ टीमचा प्रशिक्षक राहुल द्रविड याची मुलाखत इएसपीएन क्रिकइन्फो या वेबसाईटनं घेतली. या मुलाखतीमध्ये राहुल द्रविडला २५ प्रश्न विचारण्यात आले. या प्रश्नांची उत्तर राहुल द्रविडनं नेहमीप्रमाणे त्याच्या संयमानं दिली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१) प्रश्न : क्रिकेटपटू नसतास तर तू आयुष्यात काय झाला असतास?


उत्तर : मी बी.कॉम आहे आणि एमबीए करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे क्रिकेटपटू नसतो तर कॉमर्स किंवा अकाऊंट्समध्ये काहीतरी केलं असतं.


२) प्रश्न : दुसऱ्या बॅट्समनच्या खेळातून काही घ्यायचं असलं तर काय घेतलं असतंस?


उत्तर : ब्रायन लाराची प्रतिभा


३) प्रश्न : इतिहासातल्या कोणत्या बॉलरचा सामना करायला आवडलं असतं?


उत्तर : मायकल होल्डिंग आणि जेफ थॉमसन पण फक्त काही बॉल आणि हेल्मेटशिवाय नाही.


४) प्रश्न : क्रिकेटसोडून दुसरी कोणतीही ट्रॉफी जिंकायची असेल तर कोणती जिंकशील?


उत्तर : कोणत्याही खेळातलं ऑलिम्पिक गोल्ड.


५) प्रश्न : अॅडलेडमधील २३३ रन, कोलकात्यामधील १८० रन, जमैकामधील ८१ रन, तुझी आवडती खेळी कोणती?


उत्तर : यातल्या एका खेळीची निवड करणं कठीण आहे पण जमैकातील ८१ रन


६) प्रश्न : एखादं टोपण नाव स्वत:ला द्यायचं असेल तर?


उत्तर : राहुल


७) प्रश्न : इतिहासातल्या कोणत्या बॅट्समनसोबत पार्टनरशीप करायला आवडली असती?


उत्तर : सुनील गावसकर आणि सुनील गावसकर आऊट झाल्यावर जी आर विश्वनाथ. क्रिकेट खेळायला सुरुवात केली तेव्हा हे दोघंही माझे लहानपणाचे हिरो होते.


८) प्रश्न : तुझ्या आत्मचरित्राचं नाव काय असेल?


उत्तर : पुस्तक जे कधीच लिहिलं जाणार नाही


९) प्रश्न : आयुष्यामध्ये रोल मॉडेल कोण आहे?


उत्तर : माझे आई-वडिल


१०) प्रश्न : खेळताना कोणती अंधश्रद्धा होती का?


उत्तर : मी अंधश्रद्धा मानणारा व्यक्ती नाही. पण मी माझा उजवा पॅड पहिले घालायचो. पण ती सवय लागली होती.


११) प्रश्न : आत्तापर्यंत वाचलेलं सर्वोत्तम पुस्तक कोणतं?


उत्तर : रिचर्ड बार्क यांचं जॉनथन लिव्हिंगस्टन सिगल हे पुस्तक मी १५-१६ वर्षांचा असताना वाचलं होतं.


१२) प्रश्न : सुट्टीच्यावेळी कुटुंबासोबत जाण्यासाठी तुझं आवडतं ठिकाण कोणतं?


उत्तर : कुटुंबासोबत मी कर्नाटकातल्या जंगलांमध्ये जातो


१३) प्रश्न : उरलेल्या आयुष्यात फक्त एकच पदार्थ खायला दिला तर काय खाशील?


उत्तर : चॉकलेट


१४) प्रश्न : खेळाडूसोबत प्रँक करायचं असेल तर कोणासोबत केलं असतंस?


उत्तर : व्यंकटेश प्रसाद


१५) प्रश्न : कारकिर्दीमधली कायम लक्षात राहिल अशी हेडलाईन कोणती?


उत्तर : सेंट जोसेफला ट्रॉफी जिंकवून देण्यात द्रविडची मदत. शाळेमध्ये असताना कदाचित पहिल्यांदाच हेडलाईनमध्ये नाव आलं असेल


१६) प्रश्न : सध्याच्या कोणत्या बॉलरचा सामना करताना त्रास झाला असता?


उत्तर : कागिसो रबाडा आणि भुवनेश्वर कुमार


१७) प्रश्न : निवृत्त झाल्यानंतर खेळामधली कोणती गोष्ट आवडते?


उत्तर : फास्ट बॉलर आणि उसळणारे बॉल खेळावे लागत नाहीत.


१८) प्रश्न : सुपरपॉवर मिळाली असती तर कोणत्या सुपरहिरोची?


उत्तर : सुपरमॅन


१९) प्रश्न : क्रिकेटसोडून दुसरा कोणता खेळाडू आवडतो?


उत्तर : रॉजर फेडरर, विम्बल्डनमध्ये माझी आणि रॉजर फेडररची भेट झाली तेव्हा त्याच्याबरोबर फोटो काढला.


२०) प्रश्न : आवडतं क्रिकेट स्टेडियम कोणतं जिथून मॅच बघायला आवडेल?


उत्तर : लॉर्ड्स


२१) प्रश्न : कोणता बॅण्ड किंवा गायकाला लाईव्ह ऐकायला आवडेल?


उत्तर : बॉब डिलन किंवा स्प्रिंग्सटिन


२२) प्रश्न : तुझ्या आयुष्यासाठी बॅटिंग करायची असेल तर कोणाला बॅटिंग देशील?


उत्तर : सचिन तेंडुलकर


२३) प्रश्न : एका हॅशटॅगमध्ये तुला स्वत:बद्दल सांगायचं असेल तर?


उत्तर : अनकॉम्प्लिकेटेड


२४) प्रश्न : कारकिर्दीमधलं सगळ्यात गमतीदार स्लेजिंग


उत्तर : पहिल्या टेस्टमध्ये मी तिसऱ्या क्रमांकावर बॅटिंग करत होतो. कोलकाता टेस्टच्या चौथ्या इनिंगमध्ये मी सहाव्या क्रमांकावर बॅटिंगला आलो. सीरिज संपायच्या वेळी तू १२वा असशील, असं स्लेज मला करण्यात आलं.


२५) तुझ्या आयुष्यावर चित्रपट बनला तर हिरो कोण असेल?


उत्तर : आमीर खान