विराट कोहलीनं केलं एबी डिव्हिलियर्सला कॉपी
बंगळुरुविरुद्धच्या टी-20मध्ये कोलकात्याचा ४ विकेटनं विजय झाला आहे.
कोलकाता : बंगळुरुविरुद्धच्या टी-20मध्ये कोलकात्याचा ४ विकेटनं विजय झाला आहे. बंगळुरुनं ठेवलेल्या १७७ रन्सचा पाठलाग कोलकात्यानं १८.५ ओव्हरमध्ये केला. सुनिल नारायणनं १९ बॉलमध्ये ५० रन्सची खेळी केली. नारायणनं ५ फोर आणि ४ सिक्स लगावल्या. नितीश राणानं २५ बॉलमध्ये ३४ आणि दिनेश कार्तिकनं २९ बॉलमध्ये नाबाद ३५ रन्स केल्या. बंगळुरूच्या क्रिस वोक्सनं सर्वाधिक ३ विकेट घेतल्या. उमेश यादवला २ आणि वॉशिंग्टन सुंदरला एक विकेट घेण्यात यश आलं.
त्याआधी बंगळुरूनं २० ओव्हरमध्ये ७ विकेट गमावून १७६ रन्स केल्या. बंगळुरूकडून मॅक्कलम, विराट आणि एबी डिव्हिलयर्सला चांगली सुरुवात मिळाली पण त्यांना मोठा स्कोअर करता आला नाही. मॅक्कलमनं २७ बॉलमध्ये ४३, विराटनं ३३ बॉल्समध्ये ३१ आणि एबीनं २३ बॉल्समध्ये ४४ रन्स केल्या. तर मनदीप सिंगनं १८ बॉलमध्ये ३७ रन्स केल्या.
१५व्या ओव्हरपर्यंत बंगळुरुनं फक्त २ विकेट गमावल्या होत्या. एबी डिव्हिलयर्स जबरदस्त फटकेबाजी करत होता. एबीबरोबर विराट कोहलीही मैदानात होता. याचवेळी कोलकात्याचा कॅप्टन दिनेश कार्तिकनं नितीश राणाला बॉलिंग केली. यानंतर नितीश राणानं दोन बॉलमध्ये दोघांनाही पॅव्हेलियनमध्ये पाठवलं.
विराटनं केलं एबीला कॉपी
९.४ ओव्हरमध्ये बंगळुरुचा स्कोअर ७०/२ एवढा होता. यावेळी एबी ४ बॉल्समध्ये ४ तर कोहली २३ बॉल्समध्ये १४ रन्सवर खेळत होता. ९व्या ओव्हरच्या ५व्या बॉलवर एबीनं शानदार सिक्स मारली. यानंतर पुढच्याच ओव्हरला सुनिल नारायणच्या बॉलिंगवर विराटनं एबीसारखाच शॉट मारला पण सिक्सऐवजी फोर गेली.