एडिलेड :  टीम इंडियाचा (Team India) टी 20 वर्ल्ड कपमधील (T 20 World Cup 2022) पुढील सामना बुधवारी 2 नोव्हेंबरला बांगलादेश (IND vs BAN) विरुद्ध होणार आहे. टीम इंडियाचा बांगलादेशला पराभूत करुन सेमी फायनलमध्ये (Semi Final) पोहचण्याचा प्रयत्न असणार आहे. त्यामुळे या सामन्याचं महत्त्व वाढलंय. पण चिंताजनक बाब अशी की या सामन्यावर पावसाचं सावट आहे. तसंच एडिलेडमध्ये मंगळवारी आतापर्यंत जोरदार पाऊस झाला आहे. त्यामुळे पावसाच्या बॅटिंगमुळे या सामन्याचा 'गेम' होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. (adelaide weather forecast report t 20 world cup 2022 ind vs ban heavy rain know what result if match cancel due to rain)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या सामन्याला दुपारी दीड वाजता सुरुवात होणार आहे. एडिलेडमध्ये सध्या सातत्याने पाऊस होतोय. यामुळे बुधवारी हवामान साफ राहू शकतो. मात्र आता ऑस्ट्रेलियात जशी स्थिती आहे त्या परिस्थितीत मॅच होणं अशक्य वाटतंय.  बुधवारी पाऊस होण्याची शक्यता 20 टक्के आहे. 


वेदर डॉट कॉमनुसार. बुधवारी एडिलेडमध्ये दिवसा पाऊस होण्याची शक्यता ही 20 टक्के आहे.  तर संध्याकाळी पावसाची शक्यता 50 टक्के आहे.  एडिलेडमध्ये बुधवारी तापमान दिवसा 16 आणि रात्री 10 डिग्री राहू शकतं. आतापर्यंत पावसामुळे टी 20 वर्ल्ड कपमधील 2 सामने रद्द करण्यात आले आहेत. ज्यामुळे पॉइंट टेबलमध्ये मोठा फरक पडला आहे. त्यामुळे जर बुधवारच्या सामन्यात पाऊस झाला तर टीम इंडियाचा गेम होण्याची शक्यता आहे. 


पावसामुळे सामना रद्द झाला तर काय? 


टीम इंडियाने टी 20 वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत 3 सामने खेळले आहेत. टीम इंडियाने 3 पैकी 2 सामन्यात विजय मिळवला. तर एका सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. टीम इंडियाकडे 4 पॉइंट्स आहेत. टीम इंडिया सध्या ग्रुप 2 मध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारत-बांगलादेश मॅच अनिर्णित राहिली, तर दोन्ही टीमना प्रत्येकी 1 पॉइंट देण्यात येईल. याचाच अर्थ असा की टीम इंडियाचे 5 पॉइंट्स होतील. तसेच बांगलादेशचेही 5 पॉइंट्स  होतील. दोन्ही टीमचे पॉइंट्ससारखे होतील.  


वर्ल्ड कपसाठी दोन्ही संघ


टीम इंडिया : रोहित शर्मा (कॅप्टन), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुड्डा, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, आर. अश्विन, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंह आणि मोहम्मद शमी.


बांगलादेश : शाकिब अल हसन (कर्णधार), नूरुल हसन, अफीफ हुसेन, इबादत हुसेन, हसन महमूद, लिटन दास, मेहदी हसन मिराज, मुस्तफिजुर रहमान, नजमुल हुसेन शंतो, शोरिफुल इस्लाम, सौम्य सरकार, मोसादिक हुसेन, नसुम अहमद, तस्कीन अहमद आणि यासिर अली चौधरी.